बालेवाडी येथे नोव्हेंबरमध्ये होणार तेरावी आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धा

Date:

 जगदीश टायटलर यांची माहिती; भारताला चौथ्यांदा आयोजनाचा मान
पुणे : कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने २३ ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालेवाडी येथील क्रीडा संकुलात १३ व्या आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इंटरनॅशनल कुराश असोसिएशन व ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यतेने होत असून, भारत देशात कुराश इंटरनॅशनल चॅम्पियनशिप आयोजन करण्याची ही चौथी वेळ आहे, अशी माहिती कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे चीफ पॅट्रोन जगदीश टायटलर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश पोपली, महासचिव लाल सिंग, खजिनदार धर्मेंद्र मल्होत्रा, कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र पॅट्रोन ऍड.स्मिताताई निकम, तहसीलदार रोहिणी आखाडे, रोहिणी सपकाळ, कुराश महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश नगरे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे शिवाजी साळुंखे, संजय धोपगावकर, सागर जाधव, गणेश चौधरी, दुष्यन्तराजे देशमुख, वृथा जोशी, संतोष चोरमले आदी उपस्थित होते.
ऍड. स्मिताताई निकम म्हणाल्या, “कुराश हा हजारो वर्षांपासून प्रचलित असलेला दोन स्पर्धकांतील युद्धकलेचा प्रकार आहे. यंदा ही स्पर्धा भारतात आणि त्यातही आपल्या पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात होत आहे, याचा आनंद वाटतो. या स्पर्धेमध्ये ६० देशांतून ४५० स्पर्धक सहभागी होत आहेत. भारतातून दोन संघ सहभागी होणार असून, ३२ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्त्री व पुरुष अशा दोन्ही गटात, विविध वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्ज कमी करायला मदत म्हणून नॉयडा येथील जमीन विक्रीचे नियोजन

एवररेडी इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये एकत्रित महसूल आणि EBITDA मध्ये...

बांधकाम कामगारांसाठी गोदरेज प्रॉपर्टीजचा ‘गोदरेज सहयोग’ हा मानसिक आरोग्य उपक्रम

पुणे - भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या गोदरेज...

मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई -महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी...

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात प्रखर मत..

मुंबई – लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली...