Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

या पावसाळ्यात आपल्या बाळाच्या त्वचेची काळजी घेताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

Date:

डॉ. प्रदीप सूर्यवंशीप्राध्यापक व प्रमुखनवजात शिशू चिकीत्सा विभागबीव्हीयू मेडिकल कॉलेजपुणे, आणि सदस्य, इंडियन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी)

पावसाळ्यात आपल्याला तप्त उन्हाळ्यापासून दिलासा मिळतो खरा; परंतु प्रत्येक पावसाळ्यात तपमान आणि आर्द्रतेत बदल दिसून येतो. पावसाळ्याची सुरूवात आता झाली आहे आणि या काळात बाळाच्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पालकांनी त्यांच्या बाळाच्या काळजी घेण्याच्या पद्धतीत आणि नित्यक्रमात बदल करण्याची आवश्यकता आहे. नवजात बाळांची त्वचा प्रौढांपेक्षा 40-60 पट पातळ असते आणि म्हणूनच त्या अतिकोमल भागाची काळजी घेणे आणि त्याचे व्यवस्थित पोषण करणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात बाळांच्या त्वचेची काळजी घेण्याच्या सर्वोत्तम पद्धतींसाठी मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे :

मालिश करणे

बाळाला तेलाने मालिश करणे हे एक जुने तंत्र आहे. बाळाला त्याचे अनेक लाभ मिळतात. भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात बाळाला मालिश केले जाते. इंडियन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) या संस्थेच्या मते, योग्य तेलाने, योग्य पद्धतीने मालिश केल्याने बाळाच्या मनावरचे तणाव कमी होतात, ‘कॉर्टिसॉल’ची पातळी कमी होते आणि बाळाची आकलनक्षमता वाढते.

जेव्हा बाळ आरामात असते आणि भुकेले नसते, तेव्हाच त्याला मालिश करणे योग्य. त्याला मालिश करण्याची खोली उबदार असावी. आपल्या हातावर थोडे तेल ओतून घ्या आणि ते त्याच्या त्वचेवर हळूवारपणे पसरवा. हे तेल ‘व्हिटॅमिन ई’युक्त, हलके, चिकटपणा नसलेले, खनिज स्वरुपाचे असावे.  

बाळाच्या अंगावर कडकपणे मालिश करू नये. त्याऐवजी, वरच्या दिशेने चोळणे, हात वर्तुळाकार फिरवणे अशा पद्धतींनी त्याच्या पुढील व मागील अंगाला हळूवारपणे मालिश करावे. या जेंटल स्पर्शामुळे पालक आणि मूल यांच्यात भावनिक बंध निर्माण होतात. बाळाच्या त्वचेत या मालिशमुळे उबदारपणा निर्माण होतो. पावसाळ्याच्या बदलत्या तपमानात हा उबदारपणा बाळाला लाभदायी ठरतो.

सहजपणे अंघोळ घालणे

मालिशप्रमाणेच अंघोळीच्या वेळीही आपल्याला बाळासह मौल्यवान क्षण घालवता येतात. पावसाळ्यात बाळाला दररोज अंघोळ घालणे आवश्यक नसते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा त्याला अंघोळ घातली, तरी ते पुरेसे ठरते. एखाद्या उबदार खोलीमध्ये कोमट पाण्याने बाळाला अंघोळ घालावी. बाळाच्या अंघोळीसाठी पालक ‘बेबी क्‍लेन्जर’ किंवा ‘बेबी सोप’ निवडू शकतात. ही उत्पादने ‘पैराबिन’, कृत्रिम रंग आणि ‘थॅलेट्स’पासून मुक्त असल्याची आणि वैद्यकीयदृष्ट्या सौम्य व मुलाच्या त्वचेसाठी योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. ‘मिल्क प्रोटिन’ आणि ‘व्हिटॅमिन ई’ने समृद्ध असलेला ‘बेबी सोप’ हा सर्वोत्तम असतो; कारण तो त्वचेवरील जंतू हळूवारपणे धुवून टाकतो आणि त्वचा मऊ व सौम्य करतो. साबणाप्रमाणेच,  नैचुरल मिल्‍क एक्‍सट्रैक्‍ट्स, राइस ब्रैन प्रोटीन व 24 तास मॉइश्चरायझिंग यांसारख्या घटकांनी युक्त असे ‘बेबी वॉश’देखील बाजारात सहज उपलब्ध आहेत.

अंघोळ झाल्यावर बाळाला मऊ आणि उबदार टॉवेलने पुसावे. त्याच्या अंगावरील वळ्यांखालील भागदेखील व्यवस्थित कोरडे करावेत; जेणेकरून त्याच्या त्वचेवर पुरळ येणार नाही.

मॉइश्चरायझिंग महत्वाचे

एका संशोधनानुसार, भारतातील 3 पैकी 2 बाळांची त्वचा कोरडी असते. चांगले मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा लोशन वापरल्यास बाळाच्या त्वचेमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. हे चांगले उत्पादन केवळ पोषणच देत नाही तर बाळाच्या त्वचेचे रक्षणदेखील करते. ग्लिसरीन किंवा मिल्‍क एक्‍सट्रैक्‍ट्स व राइस ब्रैन प्रोटीन असलेली, 24 तासांची ‘लॉकिंग सिस्टम’ असलेली लोशन्स यासाठी वापरली जाऊ शकतात. विशेषत: अंघोळीनंतर ती वापरावीत.

मॉइश्चरायझर वापरताना, ते दोन्ही हातांवर थोडे घ्या आणि बाळाच्या पुढील व मागील बाजूस हृदयाच्या आकारात लावा. ‘व्हिटॅमिन ई’ व मिल्‍क एक्‍सट्रैक्‍ट्स असलेले ‘बेबी क्रीम’ बाळाच्या चेहऱ्यावर लावावे आणि उर्वरित शरीरावर लोशन वापरावे.

डायपर वापराबाबत काळजी

डायपर लावावयाच्या भागाची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. पावसाळ्यातील आर्द्र हवामानात ओल्या व घट्ट डायपरमुळे बाळाला त्या भागात खूप घाम येतो. परिणामी डायपरच्या भागात लाल चट्टे उमटतात, तेथील त्वचेची जळजळ होते आणि गुदद्वारापाशी जंतूसंसर्ग होऊ शकतो. .

शक्य असेल तेव्हा नेहमी डायपर बदलावा किंवा बाळाला डायपर-मुक्त ठेवावे. डायपरची जागा स्वच्छ करण्यासाठी मॉइश्चरायझिंग सामग्रीसह ‘अल्कोहोल-मुक्त वाइप्स’ वापरावेत. डायपरचे क्षेत्र स्वच्छ व कोरडे ठेवल्यास पुरळ टाळता येईल. पुरळ उठण्याची समस्या कायम राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आरामदायी कपडे

पावसाळ्यात संपूर्ण लांबीचे सुती कपडे घातल्यास, त्वचेला ताजी हवा मिळेल. त्यामुळे पुरळ टाळता येईल आणि डास चावण्यापासून बचाव होईल. जास्त पावसामुळे तपमान कमी झाल्यास, बाळाला मऊ वूलन स्वेटर घालावा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...