पुणे-प्रभाग रचनेचा निर्णय बदलण्यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात धाव घेतली आहे. यावर आज विधानसभेतील विरोधीपक्षनेते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महत्वपूर्ण भाष्य केले आहे ते म्हणाले, या सरकारला महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका पुढं ढकलायच्या आहेत. निवडणूकांसाठी त्यांना आता वेळ हवा आहे. एकनाथ शिंदे यांनीच नगरविकास खात्याचे मंत्री असताना त्यांनी नवीन प्रभागरचनेचा प्रस्ताव आणला होता आणि आता मुखमंत्री असताना त्यांनीच निर्णय बदलला.या बाबत एकनाथ शिंदे यांना जाब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.एकनाथ शिंदेंनीच घेतलेला निर्णय का बदलला असा मुल प्रश्न असल्याचे ते म्हणाले.
सध्या देशात महागाई प्रचंड वाढत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक मंडळाने शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अजित पवार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की देशात महागाई खूप वाढत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. पालकांना आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ३० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे.याआधी हे कर्ज १५ लाख रुपये होते. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्यासाठी ४० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. याआधी हे कर्ज २५ लाखांपर्यंत मिळत होते. याशिवाय गृह कर्जात देखील वाढ करण्यात आली असून संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बँकेने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.लवासा प्रकरणी सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले,लवासा बाबतीत हाय कोर्टाने केस निकाली काढली होती. मला अजून नोटीस अली नाही.चॅनेलवर बघितले.आज लवासाची काय अवस्था आहे ती बघा. दिवाळखोरीत आली आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने सोपवली असून, सीतारामन या दिनांक १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर तीन दिवस असणार आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले,
बारामती विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून निर्मला सितारामाण यांचं स्वागत करतो. बारामतीच्या विकासाची माहिती करुन घेण्यासाठी पंतप्रधान येऊन गेले. त्यासोबतच अनेकजण येऊन गेलेत. त्यांच्याकडून निर्मला सीतारमण यांना माहिती मिळाली असेल. त्यांनी बारामतीचा विकास पहायला यावे. असं अजित पवार म्हणाले,
निर्मला सितारमण यांनी निवडणूकीची जबाबदारी घेतली आहे मात्र कोणी निवडणुकीची जबाबदारी घेतल्याने काही होत नाही. उद्या मी पण वाराणसीची जबाबदारी घेऊ शकतो. मात्र जबाबदारी घेणाऱ्यांनी विचार करायचा आहे की आपण खरंच काही करु शकतो का?, आपण वेळ वाया घालवत आहोत.अशा शब्दात अजित पवार यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली.
सुप्रीम कोर्टाच्या एका वकीलाने आमिर खान विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदाल असे नाव असलेल्या या वकिलाने लाल सिंह चड्ढा या चित्रपटाबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हा पिक्चर वादात सापडला आहे. त्यावर लाल सिंग चढ्ढा चित्रपट बघितला नसल्याने मी त्यावर काहीही विधान करणार नाही मात्र आता अनेक लोक पब्लिसीटीसाठी बॉयकॉट करा किंवा अनेक प्रकारच्या चर्चा करतात. त्यावरुन जनता आकर्षित होते आणि चित्रपट बघायला जाते. यांचाही पब्लिसीटी स्टंट असू शकतो.असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे व फडणवीस यांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे बोलत आहेत .त्यावर अजित पवार म्हणाले, कुणाचंही सरकार आलं तरी 145 मॅजिक फिगर असेल तोपर्यंत सरकार टिकणार. ज्यावेळी 145 ची फिगर गेली त्यावेळी सरकार जाणार अशी घनाघाती टीका अजित पवार यांनी फडणवीस व शिंदे सरकारवर केली.