महापालिकेत पदांची होणार मोठी उलथापालथ …

Date:

पुणे – डिसेंबर महिना म्हणजे महापालिकेतील आखरी संग्रामाचा वर्षकाळ मानला जातोय ,या महिन्यात कॉंग्रेस वगळता महापालिकेतील विविध पक्षांच्या नेत्यांत मोठे फेरबदल होण्या बरोबर शहरातील काही पदाधिकारी देखील काही पक्ष बदलतील असे चिन्ह आहे. २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. यावेळी भाजपा आणि शिवसेना वेगवेगळे आहेत .महाविकास आघाडी व्होवो अथवा न होवो पण प्रत्येक पक्षाला कंबर कसायची आहे. त्यामुळे अन्य पक्षांशी गॅटमेट करणारे,नेते आता अखेरच्या वर्षात कार्यकर्त्यांच्या रडारवर असल्याने ते आधी बदला आणि नंतर महापालिका निवडणुकीला सामोरे जा अशी मागणी जोर धरते आहे. सेने ला दाबण्याचे सर्वाधिक प्रयत्न आजवर झाले असून यापुढे असे प्रयत्न होणार नाहीत उलट सेना उसळी मारून वर्षात आपले बहुमोल अस्तित्व दाखवून देईल अशा नेत्यांच्या हाथी सेनेला सूत्रे सोपवावी लागणार आहेत . तर राष्ट्रवादीला , केवळ स्वतः मोठे होणारे नेते वगळून पक्षाला मोठे करणारे नेते शोधावे लागणार आहेत.महापालिकेतील महापौरांच्या अ ँटीचेंबर मधील खाजगी बैठकांतून राजकारण ठरविणारे सर्वच गटनेत्यांविषयी कार्यकर्त्यांत प्रचंड रोष आहे.अशा स्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार शहरात चांगले सक्रीय असल्याने त्यांनी भाजपच्या शहर पातळीवर बदल केलेत पण आता महापालिकेतही ते काही उलथापालथ करणार काय ? याकडे कार्यकर्त्यांचे आणि तोंड दाबून ४ वर्षे काढलेल्या नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर यांच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाले आहे . त्यांची निवड करताना तत्कालीन खासदार संजय काकडे आणि तत्कालीन भाजपा अध्यक्ष आ. माधुरी मिसाळ यांना महापालिकेत पाठवून १८ नोव्हेम्बर  ला या महापौर,उपमहापौर यांच्या  नावांची घोषणा करण्यात आली होती . आणि याच वेळी हे दोन्ही पदाधिकारी 1 वर्षासाठी असतील याचे स्पष्टीकरण देखील या दोन्ही नेत्यांनी दिले होते. त्यानंतर  2 आठवड्यात सभागृह नेते  बदलण्यात आले.  यापैकी काहींचे समर्थक जे नगरसेवक नाहीत असे यांची कालमर्यादा वाढवा असे सांगत आहेत तर यांना बदलून आता सर्वसमावेशक ,भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि ,पदाधिकारी यांना बरोबर घेऊन जाणारे नवे चेहरे नेत्यांनी दिले पाहिजेत असा आग्रह देखील भाजपच्या गोटातून मिडिया प्रतिनिधींकडे खाजगीत मांडला जातोय .दरम्यान यावर भाजपचे पुणे शहर मुख्य प्रवक्ता संदीप खर्डेकर यांना छेडले असता , हे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादापाटील आणि नेते ,माजी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनाच असल्याचे त्यांनी सांगितले , तुम्ही म्हणताय तसे काही असेल तर हेच नेते या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे मूल्यमापन करतीलच . आणि जर वर्षाची मुदत ठरलेली असेल तर ती पाळण्याचा अगर मुदतवाढ देण्याचा अधिकार हि याच दोन्ही नेत्यांकडे आहे.  असे त्यांनी स्पष्ट केले .यासंदर्भात विचारणा करायचा प्रयत्न केला असता ,माजी खासदार संजय काकडे किंवा आमदार माधुरी मिसाळ या दोहोंशी संपर्क होऊ शकलेला नाही .मात्र महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.पण उघडपणे कोणी बोलून दाखवायला ते तयार नाहीत . लॉबी आणि एककेन्द्री कारभार   एक पदाधिकारी  करतात आणि दुसरे मात्र  विशेष मनावर घेत नाहीत . त्यांच्या वर्तनातून ते हतबल असल्याचे वाटते  असा  आरोप खाजगीतून केला जातोय.  दरम्यान महापौर पदी मुरलीधर मोहोळ २२ नोव्हेंबर ला तर ६ डिसेंबर ला सभागृहनेते पदी विराजमान झालेले धीरज घाटे यांच्याकडून पक्षाला खूप मोठी अपेक्षा होती . त्याला कारणही तसेच होते . घाटे आक्रमक हिंदुत्ववादी म्हणून प्रख्यात आहेत , नगरसेवक  घाटे आणि पोटे तसेच बालवडकर ,मेंगडे महापालिकेच्या सभागृहात आक्रमक  म्हणून प्रख्यात होते. मात्र तेव्हा सभागृहनेता म्हणून श्रीनाथ भिमाले होते . आणि महापौर पदी मुक्ता टिळक होत्या. मोहोळ महापौर झाल्यावर सभागृहातला भाजपचा आक्रमक पणा नाहीसा झाल्याचे आणि गटनेत्यांच्या बैठका महापौरांच्या दालनात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत. वास्तविक पाहता मोहोळ यांच्यावर  शिक्षण मंडळ ,पीएमपीएमएल,पीएमआरडीए, 2 वेळा स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या मानाने महापालिका अंदाजपत्रक सादर करण्याची संधी आणि आता महापौर पद अशी मोठी उधळण पक्षाने केली आहे.  त्यामानाने त्यांनी आता प्रत्येक नवीन आणि जुन्या नगरसेवकांत आपले स्थान कार्याच्याअनुषंगाने  घट्ट करणे अपेक्षित होते . पण तसे काही दिसून आले नाही ,मिळालेल्या संधीचा त्यांनी व्यापक फायदा घेण्याऐवजी कंपू शाहीला महत्व दिल्याचे बोलले जाते. या शिवाय पालिकेतील गटनेत्यांची मोट बांधून सर्वांचीच नाराजी ओढवून घेतल्याचा आरोप होतो आहे. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या पदाला 1 वर्ष पूर्ण झाले असताना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांची आचारसंहिता संपताच त्यांना बदलले जाईल असे अनेक नगरसेवकांना वाटते आहे. मात्र निर्णय केवळ फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांच्या हाथी असल्याचे सांगण्यात येते आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...