Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खुर्चीचा मोह नाही, मी नको असेल तर समोर येऊन सांगा, राजीनामा देतो -उद्धव ठाकरे (कुऱ्हाडीचा दांडा,गोतास काळ)

Date:

मुंबई : बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नकोय, त्यांनी मला सांगावं. मी राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवलंय. मला कोणताही मोह नाही, असा निरोपच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच आपली भूमिका मांडली. यावेळी भाजपसोबत जाण्याचा कोणताच विचार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी नि:क्षून सांगितलं.मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर दुसरा कोणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंदाने मान्य आहे . हेही लक्षात घ्या असेही ते म्हणाले . या शिवाय शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा हवा असेल तर तोही देतो असेही ते म्हणाले .

मी मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसल्याचे समोर येऊन सांगा. राजीनामा तयार आहे, असे म्हणत बुधवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना साद घातली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी आपली भूमिका फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विशद केली. आता यावर एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे सायंकाळी सात वाजता गुवाहटीत पत्रकार परिषद घेणार आहेत.

शिवसेना हिंदुत्वापासून आणि हिंदुंत्व शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही. विधान भवनात हिंदुत्वाबाबत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. ही शिवसेना बाळासाहेबांची नाही असे भासवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेनी तुम्हाला खूप काही गेले हे लक्षात ठेवा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शस्त्रक्रियेमुळे भेटू शकत नव्हतो. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांशी जोडलेले शब्द. हो दोन्ही शब्द कदापिही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य, एकनाथ शिंदे सारे अयोध्येला गेले. हिंदुत्वावार बोलण्याची ही वेळ नाही. मग नेमके झाले काय, ही शिवसेना कोणाची. काही जण ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही म्हणतात. ठीक आहे. असं मी काय केलंय. त्यावेळेला जे विचार होते, तेच मी पुढे नेतोय. 2014 साली प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले. पहिल्या प्रथम शिवसेना कोणाची, हिंदुत्व सोडले का, मधल्या काळात जे काही दिले, ते बाळासाहेबानंतर शिवसेनेने दिले.

सध्या राज्यात काय चाललंय. काही सूरतला गेले. त्यानंतर गुवाहटीला गेले. काल परवा विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या अधल्या दिवशी सगळे आमदार हॉटेलमध्ये होते. मी तिकडे गेलो. ज्यांना आपले मानतो. आपली माणसं यांना एकत्र ठेवावे लागते. शंका ठीक आणि लघुशंकेला गेले तर शंका. ही कसली लोकशाही.

साधा महापालिकेत उभा न राहिलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार हा प्रश्न मी पवारांना विचारला. पण त्यांनी आग्रह केला. मग म्हटलं, ठीक आहे होऊयात. राजकारण हे राजकारण असलं पाहिजे. वळणदार राजकारण रडकुंडीच्या घाटासारखं असू नये. प्रशासनाने मला सांभाळून घेतलं. मला धक्का कशाचा बसला आहे? तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने म्हटले की, आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नकोयत, तर एक वेळ ठीक आहे. आज कमलनाथ यांनी स्वत: फोन करून म्हटले की, उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण माझ्याच लोकांना मी नको आहे, त्याला काय म्हणावं?

आजही या लोकांपैकी एकानेही सांगितले की, उद्धवजी आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहात, तर मी आजच वर्षा सोडून मातोश्रीवर जायला तयार आहे. त्यांनी हे समोर येऊन बोलावे, उगाचं शिवसेनेला आम्ही सोडणार नाही, हिंदुत्वाचा मुद्दा असे याच्या त्याच्या पाशी सांगू नये. मी सत्तेला चिकटून बसणारा माणूस नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. मला सत्तेचा मोह नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण आहे, तशीच परिस्थिती आता आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडफडे नाईटक्लब आग प्रकरण: अधिकारी निलंबित, चौकशीला गती; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना, सर्व पर्यटन आस्थापनांचे सुरक्षा...

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...