महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही – आरोग्य विभागाचा खुलासा

Date:

मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाला बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

एकूण कोरोनाबाधीतांमध्ये कोरोना संसर्गित मुलांचे प्रमाण खालील प्रमाणे आहे:

  • नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या दरम्यान वयोगटानुसार बाधीतांचे प्रमाणे असे आहे – शून्य ते पाच १.३ टक्के, सहा ते अकरा वर्षे २.४ टक्के, बारा ते सतरा ४.१ टक्के, एकूण ७.८ टक्के.
  • नोव्हेंबर २०२० (वयोगट शून्य ते पाच वर्षे १.३ टक्के, सहा ते अकरा वर्षे २.१ टक्के, बारा ते सतरा वर्षे ३.५ टक्के, एकूण ६.९ टक्के)
  • डिसेंबर २०२० (वयोगट शून्य ते पाच वर्षे १.१ टक्के, सहा ते अकरा वर्षे १.९ टक्के , बारा ते सतरा वर्षे ३.३ टक्के, एकूण ६.३ टक्के)
  • जानेवारी २०२१ (वयोगट शून्य ते पाच वर्षे १.१ टक्के, सहा ते अकरा वर्षे १.७ टक्के, बारा ते सतरा वर्षे ३.२ टक्के, एकूण ६.० टक्के)
  • फेब्रुवारी २०२१ (शून्य ते पाच वर्षे १.१८ टक्के, सहा ते अकरा वर्षे २.०० टक्के, बारा ते सतरा वर्षे ४.०८ टक्के, एकूण ७.२६ टक्के)
  • मार्च २०२१ (शून्य ते पाच वर्षे १.१० टक्के, सहा ते अकरा वर्षे २.०४ टक्के, बारा ते सतरा वर्षे ३.६४ टक्के, एकूण ६.७८ टक्के)

एप्रिल २०२१ (वयोगट शून्य ते पाच वर्षे १.४२ टक्के, सहा ते अकरा वर्षे २.६२ टक्के, बारा ते सतरा वर्षे ४.३४ टक्के, एकूण ८.३८ टक्के) या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते की कोरोना संसर्गित बालकांचे प्रमाण गेल्या सहा महिन्यात जवळपास तेवढेच राहिले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संसर्गाची स्थिती काहीशी अशीच आहे. मार्च २०२१ मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात १८८ रुग्ण होते, ते एकूण रुग्णांच्या १.०१ टक्के होते, सहा ते दहा वर्षे वयोगटातील २७० रुग्ण, एकूण प्रमाण १.४५ टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात ११७३ रुग्ण, एकूणात प्रमाण ६.२८ टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात १६३१ रुग्ण एकूणात प्रमाण ८.७४ टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण १८ हजार ६६९)

एप्रिल २०२१ मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात ७५७ रुग्ण, एकूण रुग्णांच्या ०.९८ टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात १५१० रुग्ण, एकूणात प्रमाण १.९५ टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात ५३४० रुग्ण, एकूणात प्रमाण ६.९० टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात ७६०७ रुग्ण एकूणात प्रमाण ९.८३ टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण ७७ हजार ३४४)

मे २०२१ मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात १०७६ रुग्ण एकूण रुग्णांच्या १.३३ टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात १९१८ रुग्ण, एकूणात प्रमाण २.३७ टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात ६४२२ रुग्ण, एकूणात प्रमाण ७.९५ टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात ९४१६ रुग्ण एकूणात प्रमाण ११.६५ टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण ८० हजार ७८५)

यावरून हे दिसून येते की १८ वर्षांखालील मुलांमधे संसर्गाचे प्रमाण साधारणपणे सारखेच आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्या वाढीमुळे बालकांच्या संसर्गातील वाढ दिसून आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...