आबा बागुलांनी दिला फेर विचाराचा प्रस्ताव
पुणे- काल झालेल्या स्थायी समिती च्या बैठकीत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी पुणे शहरामध्ये अॅडप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेंजमेंट सिस्टीम राबविणे करता दिलेल्या मान्यतेचा फेरविचार करावा असा प्रस्ताव आज कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी दिला आहे . दरम्यान अस्तित्वात असलेले १२५ ट्राफिक सिग्नल देखभाली साठी १६५ कोटी रुपयांचे टेंडर मंजूर केल्याने हा विषय राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय बनला आहे .
आबा बागुल यांनी असे म्हटले आहे कि,’दि.२६/१०/२०२१रोजी स्थायी समितीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी पुणे शहरामध्ये अॅडप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेंजमेंट सिस्टीम राबविणे करता मागविलेल्या निविदेस महापालिकेने परिचालन व देखभाल दुरूस्तीचा खर्च रूपये ५८ कोटी व प्रतिवर्षाकरीता ११.५८ कोटी या विषयास ऐनवेळी दाखल करून मान्यता दिलेली आहे. ऐनवेळी शहराचे हिताचे महापालिकेवर दूरगामी परिणाम करणारे विषय दाखल करू नये याबाबत आम्ही आयुक्त, पुणे महानगरपालिका यांस लेखी कळविले आहे. तसेच सर्व खातेप्रमुखांना देखील विषय कार्यपत्रिकेवर येतील अशा प्रकारे देणेबाबत यापूर्वीही कळविले आहे. असे असतानाही सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाील स्थायी समितीमध्ये ऐनवेळी विषयपत्र दाखल केली जातात, ही चुकीची बाब आहे.


