आमदाराने केली चोरी :महापालिकेच्या कार्यालयातून पळविली आयुष्यमान भारत योजनेची कार्डे (व्हिडीओ)

Date:

पुणे- मतांच्या साठी आपण जनतेकडे जाऊन लाचारी करण्याऐवजी   ,जनतेला आपल्याकडे हेलपाटे मारायला लावायचे ..या कुटील हेतूने एका आमदारानेच पुणे महापालिकेच्या क्षत्रिय कार्यालयातील केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत या योजनेची हजारो लोकांची कार्डे चोरून पळवून नेल्याची तक्रार आज राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी केली .
ते म्हणाले याबाबत आम्ही पोलिसात तक्रार दिली आहे . केंद्र सरकारने गोरगरिबांच्या मदती साठी ,आरोग्याच्या देखभाली साठी आयुष्यमान भारत या योजनेची कार्डे पालिकेच्या क्षत्रिय कार्यालयातून वाटप होणार होती . पण ती  निवडणुकीपूर्वीच २ महिने अगोदर आमदाराने कार्यालयातून चोरून ,पळवून नेली .
याबाबत ची हकीकत अशी कि या आमदाराने , लोकांनी आपल्याकडे येवून हि कार्डे घेऊन जावीत या हेतूने हि कार्डे नियम बाह्य पद्धतीने पळविल्याचे समजते ज्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील साथ दिली असावी असा तर्क केला जातोय .मात्र तुपे पाटील यांनी हि चोरी आहे असा आरोप करत महापालिकेचे कामकाज पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच केले पाहिजे गरीब जनतेला अशा पद्धतीने छळण्याचा त्यांना हक्क नाही असा मुद्दा उपस्थित करत या चोर आमदाराचा छडा लावून त्यावर कारवाई करावी आणि सर्व कार्डे त्याच्या ताब्यातून परत घेऊन नियमानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या कार्डांचे वाटप करावे अशी मागणी केली आहे.सुमारे १५ ते २० हजार कार्डे आमदाराने आणून दिली नाहीत तर आम्ही प्रसंगी त्याचा छडा लावून ती असतील तिथे घुसून ताब्यात घेऊन पालिकेच्या हवाली करू  असे ते म्हणाले .या मादाराने केलेल्या या कृत्यामुळे नागरिकांना हि कार्डे ८ महिने उशिरा मिळणार आहेत आणि त्यामुळे नागरिकांना असलेल्या सुविधांना या काळात मुकावे लागले असेही ते म्हणाले .. नेमके तुपे पाटील काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात ..प्रथम एका ज्येष्ठ नागरिकाचे म्हणणे ऐका ..
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहरातून नऊ गुंड तडीपार:पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांची कारवाई

पुणे- शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केट यार्ड परिसरात दहशत...

नागरिकांच्या जीवनात सकारात्क बदल घडविण्यावर महसूल विभागाचा प्रयत्न-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसुली सेवा गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर महसूलमंत्र्यांच्या हस्ते...