निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरेल – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Date:

पुणे दि.२८: निवडणूक प्रक्रियेतील अनुभवाची देवाणघेवाण व भविष्यातील नियोजन करताना तसेच निवडणूक विषयक कामकाजाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचेसाठी आयोजित  कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या सभागृहात राज्यातील उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपायुक्त संतोष पाटील आदी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, निवडणुक विषयक कामकाज करताना आलेल्या अनुभवाची देवाण-घेवाण उपयुक्त आहे. निवडणुक प्रक्रियेतील आपले हे अनुभव पुढील निवडणूक कामकाजासाठी दिशादर्शक ठरतील. कार्यशाळेतील विचारमंथनाच्या आधारे पथदर्शी मुद्दे समोर यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्याच्या निवडणुक प्रकियेबाबतचे प्रशासकीय नियोजन, आधार लिंकेज, स्वीप कार्यक्रमात नाविन्यपूर्ण कामकाज, समाज माध्यमांचा वापर, भविष्यातील नियोजन याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा निवडणूक विषयक कामकाजासाठी अधिकाऱ्यांना उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, असे श्री.देशपांडे म्हणाले.

भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय स्तरावरील काही प्रकल्प करण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यावर सोपवली आहे. अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी राज्यावर सोपविणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. देशात निवडणूक विषयक कामकाजात राज्याने चांगली कामगिरी केली आहे. राज्यात निवडणूक यंत्रणेतील सर्वांच्या क्रियाशील सहभागाचे हे यश असल्याचा उल्लेखही श्री. देशपांडे यांनी केला.

सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी भारत निवडणूक आयोगाने केलेल्या कायद्यातील बदलाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले.

दोन दिवसीय कार्यशाळेत विविध तज्ज्ञ निवडणुक विषयक कामकाजाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेला राज्यातील सर्व जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सहभागी झाले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवजयंतीनिमित्त स्वच्छतेचा संकल्प – ‘स्वच्छता पर्व पुरस्कार’चा भव्य शुभारंभ

पुणे: आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या पावनदिनी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन...

देशातील अगदी तळागाळातील माणसापर्यंत एआय साधने पोहोचणे आवश्यक: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन

लवकरच एआय बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये मानवी क्षमतेला मागे टाकून...

एमआयटी डब्ल्यूपीयूतील २८० वर्गांमध्ये उलगडलाछत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली वारसा

देशात प्रथमच अनोखा प्रयोगः किल्ल्यांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर, ग्रंथ...