नवी दिल्ली -कोरोनाची लस सर्वात आधी कोरोना योद्ध्यांना देण्यात येईल. तसेच कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. याचा खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे.
देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना लसीकरणाबाबत चर्चा केली.
काय म्हणाले पंतप्रधान
देशभरात पार पडलेले लसीकरणाचे ड्राय रन हे देखील यश आहे. युनिव्हर्सल व्हॅक्सिनेश प्रोग्रामचा अनुभव आहे. मतदानाची सुविधेचा अभाव आहे. बुथ स्तरावरील रणनीती आपल्याला इथे अंमलात आणायची आहे. लस देणाऱ्यांची ओळखही महत्त्वाची आहे. त्यासाठी कोव्हीन अॅप आणि लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल. लसीकरणाचा रिअल टाईम डेटा अॅपवर अपलोड करणे प्राधान्य द्यावे, अन्यथा नुकसान होईल, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
…तर काय परिस्थिती आली असती विचार करा
भारतातील व्हॅक्सिन जगातील कोणत्याही लसीशिवाय किफायतशीर आहे. भारताला लसीसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागले असते तर काय परिस्थिती आली असती विचार करा, असेही पंतप्रधान म्हणाले. भारतातील परिस्थितीचा विचार करुन लस तयार करण्यात आली आहे. भारताचा अनुभव कामी येईल, असेही मोदी म्हणाले.
भारत जे करणार आहे, त्याचे इतर देश अनुसरण करतील
कोव्हिन नावाचे डिजिटल अॅप बनवण्यात आले आहे. आधार कार्डद्वारे याची नोंदणी केली जाणार आहे. कोरोनाची लस मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा त्या व्यक्तीला लस कधी दिली जाईल, याचीही यात माहिती असणार आहे. कोव्हिन अॅपवर तातडीने प्रमाणपत्र मिळेल. त्यावरुन कोणाला लस मिळेल, हे समजेल. भारत जे करणार आहे, त्याचे इतर देश अनुसरण करतील, त्यामुळे आपली जबाबदारी महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
बर्ड फ्लूबाबत अफवा पसरू नये, पंतप्रधानांचे आवाहन
देशातील काही राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. बर्ड फ्लूबाबत अफवा पसरु नये, याचीही काळजी आवश्यक आहे. आपली एकजूट आणि एकत्रित प्रयत्न प्रत्येक चॅलेंजपासून आपल्याला बाहेर काढतील, असेही मोदींनी सांगितले.
सर्वात आधी कोरोना योद्धांना देण्यात येईल लस, पहिल्या टप्प्याचा खर्च केंद्र उचलणार
Date:

