जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणातूनच तिसरी लाट थोपविणे शक्य – रवी अनासपुरे

Date:

पुणे-जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणातूनच तिसरी लाट थोपविणे शक्य होईल असे मत भाजप चे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी व्यक्त केले. यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा आणि लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची, अपंग व अन्य व्याधीने ग्रस्त नागरिकांची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन व मुकुल माधव फाउंडेशन च्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय शाळेतील लसीकरण केंद्रात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पाणी बॉटल व ग्लुकोज बिस्कीट देण्याच्या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,बूथ यंत्रणा प्रमुख कुलदीप सावळेकर, ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण, प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, प्रभाग उपाध्यक्ष शेखर जोशी,महिला आघाडी च्या पदाधिकारी गौरीताई करंजकर, संगीताताई आदवडे,मंगलताई शिंदे इ उपस्थित होते.रवीजी अनासपुरे, सौ. मंजुश्री खर्डेकर व कुलदीप सावळेकर यांच्या हस्ते केंद्रप्रमुख डॉ. शाहीन शेख, यांना थर्मल गन, सॅनिटायझर, बिस्किटे व पाणी बॉटल सुपूर्द करण्यात आले
क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर आज एरंडवणे व कर्वेनगर परिसरातील पं.दीनदयाळ उपाध्याय शाळा, कै. बिंदूमाधव ठाकरे रुग्णालय इ लर्निंग स्कुल येथे लसीकरण बंद ठेवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच ह्या केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांच्या गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली.प्रशासनाने आजवर आलेल्या लसी व त्यांचे एकूण सर्वच केंद्रावर झालेल्या वाटपाचा तपशील जाहीर करावा अशी मागणी करतानाच प्राप्त लसींचे सर्व केंद्रावर समान वाटप केले जावे व ज्यांनी एप वर अपॉइंटमेंट घेतली आहे अश्याचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे अशी आग्रही मागणी मांडली.याबाबत वाणगी दाखल तीन ज्येष्ठ नागरिकांना आलेल्या कटू अनुभवाबाबत संदीप खर्डेकर यांनी माहिती दिली.
अश्या प्रकारांमुळे सामान्य नागरिकांची ससेहोलपट होत असून प्रशासनाने असे प्रकार रोखवेत व ऍप मधे काही तांत्रिक दोष असल्यास त्याबाबत आवश्यक कारवाई करावी असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशन विविध उपाययोजना करत असून लसीकरण सुलभ व्हावे यासाठी प्रयत्नरत असल्याचे ही क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...