पुणे-मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बॉम्ब फोडू असे वक्तव्य करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा आज भाजप कार्यकर्त्यांनीपुण्यातील अलका चौकातून काढली ,पण त्यांच्या प्रतीकात्मक दहनाचा कार्यक्रम पोलिसांनी उधळून लावला ,यावेळी सुतळीबॉम्ब फोडत भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी बच्चू कडू यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या विरुध्द राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी केली.
नाशिक येथील एका कार्यक्रमात बोलत असताना शेतकऱ्यांचा आक्रोश बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही भगतसिंगने जसा विधिमंडळात बॉम्ब टाकला होता, तसा मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू , असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले होते.
या वक्तव्याचा निषेध करीत हे आंदोलन करण्यात आले . नगरसेवक शंकर पवार ,गोपाळ चिंतल ,महेश लडकत ,मनीषा घाटे धीरज घाटे ,सरस्वती शेंडगे ,स्मिता वस्ते, आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .

