पुण्यातील वाहनकराची रक्कम राज्याने पुण्यातील रस्त्यांच्या कामासाठी द्यावी- आबा बागुल

Date:

पुणे- सायकलींचे पुणे आता दुचाकींचे , पुणे चार चाकीचे पुणे , वाहतूक समस्येचे पुणे बनले आहे महापालिकेचे क्षेत्र झपाट्याने अजगरासारखे वाढतच गेले आहे . पण या एवढ्या मोठ्या क्षेत्रात प्रचंड संख्येने खरेदी होणाऱ्या वाहनांवर वाहन कर लाऊन आरटीओ हा कर राज्य सरकारला देते , दुसरीकडे महापालिकेची आर्थिक अवस्था गेल्या ४/ ५ वर्षात डबघाईला आणून ठेवल्याने आता ऍमिनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या दिवाळखोरीकडे नेणाऱ्या अवाजवी कल्पनाना थारा देण्यात येऊ लागला आहे हि बाब लक्षात घेता राज्य सरकारने पुण्यातून जमा होणाऱ्या वाहन करापोटीची 50 टक्के रक्कम पुण्यातील रस्ते विकासासाठी द्यावी अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.

ते म्हणाले,’ पुणे शहरात दरवर्षी लाखो नव्या वाहनांची नोंद होते. त्यासाठी आकारले जाणारे वाहन कराची रक्कम राज्य शासनाकडे दिली जाते. ती ५० टक्के रक्कम पुणे शहराच्या रस्ते विकास कार्यक्रमासाठी दिली जावी या साठी पुणे मनपा काँग्रेस गटनेते आबा बागूल यांच्या मागणीचे पत्र पुणे आरटीओने पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठविल्याची माहिती आबा बागूल यांनी दिली.
महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीमध्ये यामध्ये मोठी भर पडणार असून त्याचा पुणे महानगरपालिकेने सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे असे आबा बागूल म्हणाले. पुणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीसाठी ऍमिनिटी स्पेस भाड्याने देण्यापेक्षा अशा नवीन कल्पनांच्या आधारे उत्पन्न वाढ करून घ्यावी, त्यादृष्टीने पुणे शहरात नोंदविल्या जाणा-या नव्या वाहनांच्या नोंदणी करताना वाहन कराची रक्कम ५० टक्के रक्कम पुणे महानगरपालिकेला रस्ते विकासासाठी मिळावी, ही मागणी रास्त असून पुणे आरटीओने मागणीपत्र राज्य शासनाकडे पाठविल्याचे कळविले आहे. त्याबद्दल मी पुणे आर. टी.ओ. ला धन्यवाद देतो. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील सर्वच शहरे, गावे यांना याचा फायदा होईल.असे आबा बागुल यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...