Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

छतावरील सौर ऊर्जेच्या तब्बल ८११ मेगावॅट विजेची यंत्रणा ‘नेटमिटरींगद्वारे कार्यान्वित

Date:

महावितरणकडून सौर ऊर्जेला प्राधान्यक्रमाने वेग

मुंबई: सौर ऊर्जेपासून वीजनिर्मितीला प्राधान्याने गती देत महावितरणकडून सद्यस्थितीत ४४ हजार ६४३ वीजग्राहकांच्या छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जेपासून निर्मित तब्बल ८११ मेगावॅट वीज ‘नेटमिटरिंग’द्वारे ग्रीडमध्ये घेण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सौर ऊर्जा धोरणाला अनुसरून महावितरणकडून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी वेग देण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी विविध उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत.

 केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या योजनेतून घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी ४० टक्क्यांपर्यंत अनुदानाद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. आतापर्यंत महावितरणकडून (कंसात मेगावॅट) ३० हजार ९९९ घरगुती (१८५), २४५७ औद्योगिक (३५९), ७८७१ वाणिज्यिक (१४७), ३२०६ सार्वजनिक सेवा (११०) आणि ११० इतर (१०) ग्राहकांकडील छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मितीची वीज घेण्यात येत आहे. कोरोनाच्या काळातही महावितरणने छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मितीसाठी जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे या योजनेला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या योजनेतून महावितरणला सन २०१९-२० मध्ये २५ मेगावॅटचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मनुष्यबळाची कमतरता, कच्चा मालात ३० ते ३५ टक्के दरवाढ, सोलार पॅनेलच्या किंमतीत वाढ आणि जीएसटी करात वाढ आदी कारणांमुळे योजनेस अत्यंत प्रतिसाद कमी मिळाला होता. छतावरील सौर ऊर्जा यंत्रणेच्या योजनेतील महावितरणशी संबंधीत कामांना आणखी वेग देण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी वरिष्ठ पातळीवर नुकतीच आढावा बैठक घेतली.

सौर ऊर्जेच्या विविध कामांना गती देण्यासाठी व अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करणे तसेच महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांसाठी मार्गदर्शक तत्वे (एसओपी) जाहीर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, सौर ऊर्जेच्या योजनेची प्रसिद्धी व जनजागरण तसेच ग्राहकांच्या तक्रारी व शंकांचे ताबडतोब निरसन करण्याचे निर्देश श्री. विजय सिंघल यांनी यावेळी दिले. त्याप्रमाणे या योजनेविषयक संपूर्ण माहिती व ‘ऑनलाईन’ अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्वे, सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे आदींची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सौर ऊर्जेच्या योजनेसाठी ‘ऑनलाईन’ अर्ज व संपूर्ण माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ismart/ या लिंकद्वारे स्वतंत्र वेबपोर्टल उपलब्ध करण्यात आले आहे. 

या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ग्राहकांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे सन २०२१-२२ वर्षासाठी आणखी ५० मेगावॅटचे उदिद्ष्ट निर्धारित करण्यात आले आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी पात्र संस्थांची नियुक्ती करण्यासाठी महावितरणने नुकतीच ई-निवीदा प्रक्रिया सुरू केली आहे.

केंद्र शासनाकडून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी वित्त सहाय्य देण्यात येत आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे. तसेच या यंत्रणेला महावितरणकडून लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर सर्वच वर्गवारीतील ग्राहकांकडून  शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जात आहे. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौर प्रकल्पातून निर्माण झालेल्या विजेच्या स्वयंवापरामुळे वीजबिलात होणारी बचत तसेच श्लिलक विजेची विकगी याचा एकत्रित लाभ विचारात घेता यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः ३ ते ५ वर्षात परतफेड होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...