देश अपघातमुक्त होण्यासाठी शासनाबरोबरच मोटार ड्रायव्हिंग स्कूल संस्थांची भूमिका महत्वाची – जितेंद्र पाटील 

Date:

पुणे : देश अपघातमुक्त होण्यासाठी शासन, प्रशासनाबरोबरच मोटार ड्रायव्हिंग स्कूल संस्थांची भूमिका महत्वाची आहे. तसेच शालेय शिक्षण विभागाने वाहतूक नियमावलीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा. शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषयक अभ्यासक्रम समाविष्ट केल्यास नवीन वाहन चालकांना प्रशिक्षण देणे यासाठी व्यासपीठ मिळेल. त्यासाठी प्रशिक्षण देण्याकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे असे मत राज्याचे सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय व महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात जितेंद्र पाटील बोलत होते. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  संजीव भोर, सीआयआरटी चे  प्रशांत काकडे, टोयोटा कंपनीच्या संपदा घाग, मारुती वाहन उद्योग समूहाचे  नीरज कुदळे व संघटनेचे अध्यक्ष  ज्ञानेश्वर वाघोले उपस्थित होते.

पाटील म्हणाले, मागील काही वर्षापासून वाहन चालकांचा प्रवास, अपघातमुक्त होण्यासाठी शासन कसोसीने प्रयत्न करत आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूल संस्थांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून आपल्या व इतरांच्या कुटूंबाची जिवीत हानी होणार नाही यासाठी कसोसीने प्रयत्न केले पाहिजेत. 

रस्ते वाहतूक तज्ज्ञ दत्तात्रय सस्ते, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, यशदा या संस्थेचे निवृत्त सहसंचालक डॉ. सुनिल धापटे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

पुण्यातील १०० वर्षे पुर्ण झालेल्या आपटे मोटार स्कूलच्या तिसऱ्या पिढीतील विलास आपटे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुळचे पुणेकर असलेल्या मंदार ताम्हाणकर यांनी आस्ट्रेलिया मध्ये गुरू मोटार ड्रायव्हिंग स्कूल ॲकॅडमी ही संस्था स्थापन करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्याबद्दल निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश बाग यांनी त्यांची प्रगट मुलाखत घेतली.  सदर कार्यक्रमासाठी राज्यातून ३००हून अधिक संस्थाचालक सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विठ्ठल मेहता,विजय दुग्गल, कृष्णा दाभाडे, महेश शिळीमकर ,एकनाथ ढोले, देवराम बांडे, इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...