पुणे- पुणे महानगरपालिके मध्ये भाजपा रिपाई युतीच्या माध्यमातुन उपमहापौरपदावर गेली
महिना दिड महिना पक्षातील अतंर्गत वरिष्ठ नेत्यांपर्यंत चर्चा होऊन शेवटी रिपब्लिकन पक्षाला शेवटच्या वर्षात उपमहापौरपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज पुणे महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाच्या गटनेत्या व नगरसेविका सौ.सुनिता परशुराम वाडेकर यांचा उपमहापौरपदा साठीचा अर्ज नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्या कडे सुपुर्त करण्यात आला.
या प्रसंगी खासदार गिरिष बापट,महापौर मुरलीधर मोहोळ,भाजपाचे शहरअध्यक्ष जगदिश मुळीक,रिपाई चे शहरअध्यक्ष संजय सोनावणे,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने ,सभागृह नेते गणेशबिडकर, रिपब्लिकन नेते परशुराम वाडेकर, अॅड.आयुब शेख, अॅड. मंदार जोशी,
अशोक शिरोळे , बाळासाहेब जानराव, अविनाश कदम, विजय ढोणे, महादेव
साळवे ,दादा वारभुवन ,अर्जिंक्य गाडे,अॅड.ज्ञानेश जावीर, आदी उपस्थित होते.

