Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

हडपसर व विमाननगर येथील निवासी सदनिकांची नोंदणी व वितरणाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरु

Date:

पुणे दि.2 :- पुणे मेट्रो प्रकल्प 1, 2 व 3 यामुळे कामगार पुतळा व राजीव गांधी नगर, शिवाजीनगर, पुणे येथील बाधीत होणा-या झोपडपट्ट्यांमधील पात्र झोपडीधारकांना विमाननगर व हडपसर येथील उपलब्ध असलेल्या निवासी सदनिकांचे मोफत वाटप करणेबाबत शासनाकडून निर्णय झाला असून सर्व पात्र झोपडीधारकांना वितरीत करावयाच्या विमाननगर येथील उर्वरीत व हडपसर येथील सर्व उपलब्ध निवासी सदनिकांच्या नोंदणीकरणाचे (रजिस्ट्रेशन) व प्रत्यक्ष सदनिका वितरीत करण्याचे काम शुक्रवार दि. 4 जून ते मंगळवार दि.8 जून 2021 पर्यंत (शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवसांसह) पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


हडपसर येथील सी व डी विंग इमारतीमधील सर्व सदनिका धारकांनी सह-दुय्यम निबंधक, वर्ग-2, हवेली क्र.10,5, फायनान्स रोड, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, पुणे-1 येथे विमाननगर येथील सी, डी, विंग मधील उर्वरित सदनिका धारकांनी सह-निबंधक वर्ग-2, अनुक्रमे हवेली क्र. 21 व 22, सर्व्हे नं. 39/2/2, सिटी सर्व्हे नं.943, गांधी लॉन्स समोर, युगाई मंगल, पहिला मजला, एरंडवणे येथे तर विमाननगर येथील ई विंग मधील सदनिका धारकांनी सह-दुय्यम निबंधक, वर्ग-2, हवेली क्र.25, विनी यार्ड चर्चच्यासमोर, सिध्दी टॉवर्स, सीएनजी पेट्रोलपंप मागे, गणेशनगर, दापोडी, पुणे-12 येथे नोंदणी करावी.
वरीलप्रमाणे सदनिकांचे नोंदणीकरण हे प्रथम उपस्थित राहणा-यास प्राधान्य त्यानुसार वरील पाचही संबंधित सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयामध्ये प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते सांयकाळी 6 या वेळेत प्रति कार्यालय 30 सदनिकांचे टोकन पध्दतीने नोंदणीकरण करण्यात येईल. मूळ आधारकार्ड व हे सुचनापत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तरी त्यानुसार संबंधितांनी आपल्या संबंधित कार्यालयामध्ये वेळेत उपस्थित रहावे.
वरीलप्रमाणे सदनिकेच्या नोंदणीकरीता आपण दिलेल्या दिवशी व वेळी उपस्थित न राहिल्यास आणि / अथवा नोंदणीकरण होऊन निश्चित केलेल्या कालावधीत प्रत्यक्ष त्यांचे सदनिकेचा ताबा न घेतल्यास त्यांना याकामी सदनिका स्विकारणेसाठी आपण इच्छुक नाही असे समजून आपणांस वितरीत करण्यात आलेली मोफत सदनिका रद्द करण्याची व आपली सध्याच्या झोपडीच्या निष्कासनाची कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. याची अधिक माहिती कार्यालयाच्या srapune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“डॅा. बाबा आढावांचा वारसा थांबणार नाही; सामाजिक चळवळीत आम्ही खंबीरपणे सोबत!”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांसमोर ग्वाही; सांत्वन...

एपस्टाइन फाईल १९ डिसेंबरला जाहीर होणार काय ? पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात समजून घ्या …

पृथ्वीराज चव्हाण यांनी Epstein Files बाबत भारतात उडविली खळबळ अमेरिकेच्या...