‘द प्रिन्सेस’ कादंबरी ‘स्टोरीटेल मराठी ऑडीओ बुक्समध्ये’

Date:

इंग्रजी साहित्यातील ‘भारतीय प्रिन्स’ अशी ख्याती असलेले प्रख्यात लेखक मनोहर माळगावकर यांची भारतीय संस्थानांच्या विलीनीकरणाच्या अत्यंत गाजलेल्या विषयावरची ‘द प्रिन्सेस’ हि भावस्पर्शी कादंबरी ‘स्टोरीटेल मराठी’वर ऑडिओबुकमध्ये प्रकाशित होत आहे. मनोहर माळगावकरांच्या ‘द प्रिन्सेस’ या कादंबरीला जभरातील साहित्यरसिकांनी विलक्षण प्रतिसाद दिला आहे. ‘प्रिन्सेस’चा उत्कंठावर्धक अनुवाद भा.द. खेर यांनी केला आहे. ही संपूर्ण कादंबरी प्रसिद्ध अभिनेते श्रीरंग देशमुख यांच्या आवाजात ऐकण्याची अनमोल संधी स्टोरीटेलने मराठी रसिकांना दिली आहे.

माळगावकरांना भारतीय इतिहासाचे विशेष आकर्षण होते. त्यांनी ‘कान्होजी आंग्रे द सी हॉक मराठा ऍडमिरल’, ‘पुअर्स ऑफ देवास’, ‘सिनियर आणि छत्रपतीज ऑफ कोल्हापूर’ हे इतिहास ग्रंथ लिहिले. ‘द मेनू हू किल्ड गांधी’ हे त्यांचे गाजलेले पुस्तक म्हणजे भारताची फळणी, स्वातंत्र्य आणि गांधीजींचा खून याचा पुनर्प्रत्यय आहे. वेधक कथावस्तूची निवड, कथनाचे कौशल्य, नाट्यमय प्रसंगांची विखुरणी ही माळगावकरांच्या कथा-कादंबऱ्याची लक्षणीय वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या साहित्य योगदानाबाबत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

साधारण १९६२-६५ चा उत्कंठावर्धक काळ ‘द प्रिन्सेस’मध्ये रेखाटण्यात आला आहे. ‘बेगवाड’ नावाच्या काल्पनिक संस्थानिकांच्या जीवनावर या कादंबरीचे कथाबीज पेरण्यात आले आहे. संस्थानाचे राजे आहेत हिरोजी महाराज आणि कादंबरीचा नायक आहे राजपुत्र अभय. सुरुवातीला अभय व आईचे ममतेचे, प्रेमाचे संबध असतात, वडिलांशी मात्र तितके जवळिकीचे नसतात. परंतु जसजसे वय वाढत जाते तसतसे अभयच्या मनात वडिलांबद्दल आदरभाव निर्माण होतो. माळगावकरांनी नात्यांमधील हा बदल छान रंगवला आहे. संस्थानाचा जुना खजिना असतो. भारताला स्वातंत्र्य मिळणार असते, संस्थानांचे विलीनीकरण होणार असते. हे सहन न झाल्याने व आपण जिथे राजा म्हणून राहिलो तिथे साधा नागरिक म्हणून राहणे हे हिरोजी महाराजांना सहन होत नाही. शिकारीच्या बहाण्याने ते शांतपणाने मृत्यूला सामोरे जातात. अभय फक्त ४९ दिवसांसाठी राजा बनतो. दोघांच्याही मनातील ते मानसिक-भावनिक द्वंद्व माळगावकरांसारख्या सिद्धहस्त लेखकाने अत्यंत समर्थपणे कादंबरीत रंगविले असून ते स्टोरीटेलवर अभिनेते श्रीरंग देशमुख यांच्या भारदस्त आवाजात ऐकताना उत्कंठा शिगेला पोहचते.

‘स्टोरीटेलवर इतिहासप्रेमी रसिकांना रोमहर्षक आनंद देणाऱ्या ‘द प्रिन्सेस’ला  ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

‘जग बदलणाऱ्या या ग्रंथांचं महत्व स्टोरीटेलवर ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/books/the-princess-1524335

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...