पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवन इमारतीच्या छतावरील राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण

Date:

नवी दिल्ली, 11 जुलै 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी नवी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या छतावर बांधलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण झाले.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे–

“संसद भवनाच्या छतावर उभारलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे आज सकाळी अनावरण करण्याचा सन्मान मिळाला.”

यावेळी पंतप्रधानांनी संसद भवनाच्या उभारणीसाठी कष्ट घेणाऱ्या श्रमिकांशीही संवाद साधला.

“हे संसद भवन बांधण्यासाठी कष्ट करणाऱ्या सर्व श्रमिकांशी माझा अत्यंत चांगला संवाद झाला. त्यांच्या सर्व प्रयत्नांचा आम्हाला अत्यंत अभिमान असून देशासाठी त्यांनी दिलेले योगदान आम्हाला कायम लक्षात राहील.” 

हे राष्ट्रीय मानचिन्ह ब्रॉन्झपासून बनवले असून त्याचे एकूण वजन 9500 किलोग्राम आहे. तर उंची 6.5 मीटर इतकी आहे. या मानचिन्हाला आधार देणारी, 6500 किलोग्रामची पोलादाची रचना देखील त्याच्याभोवती बसवण्यात आली आहे. नव्या संसद भवनाच्या बरोबर मध्यावर हे मानचिन्ह बसवण्यात आले आहे.

या मानचिन्हाची संकल्पना रेखाटन आणि आणि त्यानंतर तसा आकार देऊन ते तयार करणे हे काम  तसेच, मानचिन्हाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वी आठ विविध स्तरांवर काम करण्यात आले होते. यात, क्ले मॉडेलिंग/कम्प्युटर ग्राफीकच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...