पुणे, दि.२७ सप्टेंबर: “सबका साथ सबका विकास नुसार भारताने शेजारील राष्ट्रांबरोबर मैत्री संबंध स्थापित केले आहे. बांग्लादेश, भूतान, नेपाल, श्रीलंकाबरोबरच अनेक देशांबरोबर स्थानिक विकास कार्यक्रम सुरू केले आहेत. शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र आणि रेल्वे प्रकल्प सुरू केले आहेत. सीमावाद प्रश्न, ड्रग्स आणि मानवी तस्करी यांसारख्या गोष्टींना आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर पाऊले उचलली आहेत.” असे मत परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी व्यक्त केले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदेेच्या नवव्या सत्रात ‘आंतरराष्ट्रीय संबंधः शेजार्यांशी समेट’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी अरूणाचलप्रदेश विधानपरिषदेचे उपसभापती टेसम पोंगटे, आमदार अनुप कुमार सहा, आमदार अखिलेश पती त्रिपाठी, माजी न्यायधिश हसनैन मसुदी आणि जम्मू-काश्मीर येथील माजी उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल कुमार सिंग हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि रवींद्रनाथ पाटील हे उपस्थित होते.
व्ही. मुरलीधरन म्हणाले,“ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेजारील राष्ट्रांमध्ये कम्यूनिटी डेव्हलपमेंट कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. त्यांनी दोन्ही देशांच्या सीमा ओलांडून रेल्वे प्रकल्प, पाणी, ऊर्जा यांसंदर्भात वेगवेगळे करार केले आहेत. सामाजिक, आर्थिक प्रगतीचे कार्य सुरू आहे. तर दुसरीकडे दहशतवादी संघटनेला थांबविण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तानसारख्या देशाबरोबर ही चांगले संबंध टिकवून ठेवले आहेत. तसेच, भारत-चीन संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत. यामुळेच टेली मेडिसिन, टेली कम्युनिकेशन, यूपीआय, रूपी कार्ड यासारख्या योजना राबविल्या जात आहेत. भारत हा ज्ञानाचे मंदिर असल्याने भविष्यात संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल.”
टेसम पोंगटे म्हणाले,“युवकांनी सकारात्मक विचार ठेवून कार्य करावे. सदैव चांगले शिकत रहा, तरच जीवनात यश निश्चित मिळेल. आम्ही भाई भाई या गोष्टीवर विश्वास ठेवतो म्हणून शेजारील राष्ट्रांबरोबर सदैव चांगले नाते जुळले आहे. यातून भविष्यात पर्यटन वाढून त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढेल. पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी यात्रा काढली होती पण नंतर त्यांनी कारगिल युध्द केले. एवढे असूनही आज आम्ही भाईचारावर विश्वास ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे स्टेटस वाढविले आहे.”
अनूप कुमार सहा म्हणाले,“देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी युवकांची भूमिका सर्वात महत्वाची असेल. आमची संस्कृती ही वसूधैव कुटूंबकम् आहे. त्यामुळे हे विश्वची माझे घर या तत्वानुसार युवकांचे वर्तन असावे. २१ व्या शतकात भारत कसे हवे आहे यानुसार युवकांनी कार्य करावे. देशाला पुढे नेण्यासाठी युवकांची भूमिका महत्वाची असेल.”
डॉ. निर्मल कुमार सिंग म्हणाले,“भारत सरकारने दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळेच देशात शांतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारील राष्ट्रांना ही कळुन चुकले की भारताची भूमिका ही सदैव शांतीची आहे. वसुधैव कुटुंबकम् या तत्वानुसार भारत आपले कर्तव्य बजावत आहे. त्यामुळेच भारत लवकरच विश्वगुरू बनेल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“भारतीय छात्र संसद एक ध्येय ठेऊन कार्य करीत आहे. तरुणांनी समाजाच्या विकासासाठी कार्य करावे. समाजामध्ये सुख, समाधान आणि शांती निर्माण करण्यासाठी तरूणांनी सक्रिय सहभाग घ्यावा. यातूनच नव भारताची निर्मिती होईल.”
हसनैन मसुदी म्हणाले,“आमच्या देशासमोर सर्वात मोठी समस्या दहशतवाद्यांची आहे. ती सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी कार्य सुरू केले आहे.”
अखिलेश पती त्रिपाठी यांनी आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल आपले विचार मांडले. विद्यार्थी प्रतिनिधी अमन केशरवाणी, राजेश्वरी कराड, प्रतिक्षा मिश्रा, सारिफुल इस्लाम, मनिष जुंग आणि अब्दुल साहिबजादा यांनी आपले विचार मांडले.
प्रा. डॉ. अंजली साने यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.चयनिका बसू यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुदिप्ता बॅनर्जी यांनी आभार मानले.
पंतप्रधानांनी मैत्री राष्ट्रांबरोबर सुरू केले विकास कार्य संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन
Date:

