Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोविड मदतीसाठी 100 कोटी रुपयांची गुंतवणूक पिरामल फाउंडेशन करणार

Date:

हा उपक्रम महाराष्ट्रातले 4 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांतील 1.25 लाख लोक आणि देशभरातील 20 लाख लोकांपर्यंत पोहोचणार

§  भारतातील अपुऱ्या आरोग्य सुविधा असलेल्या आदिवासी आणि ग्रामीण भागात 100 कोविड केंद्रे स्थापन करणार

§  कोविडची लक्षणे नसणाऱ्या व सौम्य लक्षणे असणाऱ्या 20 लाख रुग्णांना घरगुती मदत पुरवून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करणार

मुंबई – पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड (पीईएल) कंपनीचा समाजसेवी विभाग असलेल्या पिरामल फाउंडेशनने कोविडच्या दुसऱ्या लाटेचा तीव्र फटका बसलेल्या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांना मदत करण्यासाठी मोठा उपक्रम लाँच केला आहे. कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा तीव्र फटका बसलेल्या 25 जिल्ह्यांतील ग्रामीण व आदिवासी भागात फाउंडेशनतर्फे 100 कोविड केंद्रे स्थापन केली जाणार आहेत, तर पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसलेल्या देशभरातील 112 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांतील ग्रामीण व आदिवासी भागात होम केयर सपोर्ट दिला जाणआर आहे. निती आयोगाबरोबरच्या भागिदारीता हा उपक्रम राबवला जाणार आहे. पिरामल फाउंडेशन निती आयोगाच्या सहकार्याने महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमधे कोविड मदत कार्यासाठी 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

ही मदत 1000 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांच्या नेटवर्कद्वारे 1143 ब्लॉक्समधील 2 दशलक्ष लोकांना दिली जाणार आहे. केवळ एकट्या महाराष्ट्रातच गडचिरोली, नंदूरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या 4 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यातील 32 ब्लॉक्समधील 1.25 लाख लोकांना मदत करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रामधे या 4 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या जिल्ह्यांतील एकूण रुग्णसंख्या 1.6 लाख असून येथे जवळपास 3063 मृत्यू झाले आहेत. ही संख्या दररोज वेगाने वाढत असून एकूण मृत्यूंपैकी 3.3 टक्के मृत्यू केवळ या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांत होत आहेत.

पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडच्या उपाध्यक्ष आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. स्वाती पिरामल म्हणाल्या, ‘शहरी भागातून ग्रामीण भागात महामारी वेगाने पसरत असताना दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यास सरकारचे प्रथम प्राधान्य आहे. मर्यादित सार्वजनिक आरोग्य सुविधा, कुशल मनुष्यबळाचा अभाव यांमुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणा रुग्णसंख्येत झालेली वाढ हाताळण्यास सक्षम नाही. ही दरी भरून काढण्यासाठी तातडीच्या आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची गरज आहे. ‘अनामाया’ हा आदिवासी आरोग्य उपक्रम आणि पिरामल फाउंडेशनचे इतर उपक्रम यंत्रणेवरील ताण कमी करतील तसेच ग्रामीण व आदिवासी समाजातील आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करतील.’

25 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांत ब्लॉक पातळीवर 30 बेड्सची तात्पुरती कोविड केयर केंद्रे उभारली जाणार असून त्यात महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्र संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाधित परिसरामधल्या लोकसंख्येला सेवा देतील. हे केंद्र कोविड पॉझिटिव्ह, लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरणाठी आणि आवश्यक सेवांसह मोकळी हवा असलेल्या खोलीत उपचार घेण्यासाठी मदत करेल.

होम केयर सपोर्ट 112 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांतील 20 लाख ग्रामीण व आदिवासी समाजाला 1000 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत करणार आहे. त्याशिवाय 1 लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक कोविड रुग्ण आणि कुटुंबांना लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी मदत करतील. स्थानिक स्वयंसेवी संस्था स्वयंसेवकांना प्रशिक्षित करून ते इन बाउंड- आउट बाउंड्स कॉल्सच्या मदतीने केयरटेकर्सना कोविड नियमांचे पालन करण्यासाठी व रुग्णांचे वेळीच निदान करण्यासाठी काम करतील.

या महामारीने आपल्या सर्वांनाच एकत्रितपणे काम करण्यातली ताकद परत दाखवून दिली आहे. समाजसेवी केंद्रे आणि नागरी सोसायटी संस्थांनी प्रत्येक जिल्ह्यातील तयारी व कोविड प्रतिसादासाठी मोठे योगदान दिले आहे. पिरामल फाउंडेशन हा नंदूरबारमधील आमच्या टास्क फोर्समधील महत्त्वाचा घटक असून गेल्या तीन वर्षांपासून आम्हाला अस्पिरेशन्ल डिस्ट्रिक्ट्स प्रोग्रॅमसाठी मदत करत असून दुसऱ्या लाटेमधे आम्हाला मदत करण्यात त्यांनी कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. त्यांनी आम्हाला वैद्यकीय वस्तूंचा पुरवठागृह विलगीकरण केंद्रांचा पाठपुरावाकर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणलसीकरणासाठी समाजाला एकत्र करणेसमाजाला तसेच आदिवासी प्रमुखांना कोविडयोग्य वागणुकीचे धडे देणे अशा सर्व बाबतीत मदत केली,’ असे नंदूरबार महाराष्ट्राचे जिल्हा दंडाधिकारी म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...

बांग्लादेशी राज्यात आणून सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या जवळचे ड्रग्सचे कारखाने चालवत आहेत.

ड्रग्स कारखानाप्रकरणी पकडलेल्या ४३ पैकी ४० बंगाली व बांग्लादेशी...

बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय मुलाचा मृत्यू:शेतात खेळत असताना आई-वडिलांसमोरच ओढून नेले

शिरूर-जुन्नर सीमेवरील पारगावमधील घटना पुणे- जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्याच्या...