Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बारामती कनेक्शनशी संबंधित पेन ड्राइव्ह बाहेर काढणार, पण त्याचा बारामतीच्या नेत्यांशी काहीच संबंध नाही; देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह

Date:

मुंबई -बारामतीशी कनेक्शन असलेल्या आणखी एका तक्रारीचा माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे; पण फाँरेन्सिक ऑडीट होणे बाकी आहे. त्यामुळे मी तुर्तास कुणावर आरोप लावत नाही. बारामतीच्या नेत्यांशी या पेनड्राईव्हचा संबंध नाही. हा पेनड्राईव्ह मी केवळ गृहमंत्र्यांना देणार आहे. एका माजी सनदी अधिकाऱ्याने 42 एकर जमीन कशी लाटली त्याला मुंबईच्या कोणत्या मंत्र्यांनी मदत केली याचा पर्दाफाश मी करणार असल्याचा गौफ्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला, सोबतच महाविकास आघाडी सरकारला इशाराही दिला.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/712819916393517

विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले. त्यावेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रखर टीका केली. फडणवीस सुमारे दीड तास सभागृहात बोलत होते, तेव्हा सभागृहात भयान शांतता पसरली.

महाविकास आघाडी सरकार गुन्हा दाखल केला तरीही आरोपींना अटक करीत नाही. पोलिस दारुपार्टी करुन नागरीकांना मारहाण करतात अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढले.

काय आहे पेनड्राईव्हमध्ये

फडणवीस म्हणाले की, इसाक बागवान हे पोलिस दलातील माजी अधिकारी व एनकाऊंटर स्पेशालिस्ट आहेत. त्यांच्याविरुद्धची ही तक्रार आहे. बारामतीत 42 एकर जमीन त्यांनी घेतली व माया गोळा केली आहे. तेथून मुंबईतील संपत्ती खरेदीपर्यंतचा हा प्रवास आहे. त्यांनी कुटुंबातील नातेवाईकांच्या नावाने या जमीनी खरेदी केल्या आहेत. या पेनड्राईव्हमध्ये इसाक बागवान यांचे भाऊ नसीर बागवान यांचे स्टींग ऑपरेशन आहे. मुंबईचा मोठा नेता कसा बारामतीला गेला, त्याने तेथे केलेली मध्यस्ती हे सर्व पेनड्राईव्हमध्ये आहे.

इसाक बागवान याने मुंबईचा माफिया हाजी मस्तान याच्या एका अपहरण प्रकरणात केलेली मदत या सर्व गोष्टी या पेनड्राईव्हमध्ये असल्याचे सांगितले.

मुंबईला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजू नये

महाविकास आघाडी नव्हे तर महाविनाश आघाडी अशा शब्दात त्यांनी सरकारची खिल्ली उडविली. मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. मुंबई पालिकेतील सत्ताधारी मुंबईला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजते अशी टीकाही त्यांनी केली.

शक्ती कायद्याचा उपयोग काय?

पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघूनाथ कुचिक यांना अटक झाली नाही. एफआयआर दाखल केला पण अटक नाही मग सरकारने आणलेल्या शक्ती कायद्याचा उपयोग काय असा सवाल फडणवीसांनी केला. पीडित मुलीच्या घरच्यांवर कुचिकांकडून दबाव आणला जात आहे. माझ्याकडे चॅटींगचे पुरावे आहेत. अटक न करणाऱ्यांवर कारवाईचा नियम आहे पण कुठलीही कारवाई केली जात नाही.

सरकारची चालाखी

गृहमंत्री महोदय अत्यंत हुशार आहेत. सरकारी वकील प्रविण चव्हाणांचा त्यांनी राजीनामा घेतला पण एकाच केसमध्ये त्यांचा राजीनामा घेतला गेला. इतर केसेसमध्ये ते आजही सरकारी वकील आहेत. मग न्याय कसा मिळणार सांगा असा सवालही त्यांनी गृहमंत्र्यांना केला.

कायदा सुव्यवस्थेचा केला पंचनामा

  • बीडमध्ये अंबाजोगाईत बांधकाम विभागाचे अधिकारी धमक्या देतात.
  • मुंबईकरांची लुट सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणू
  • नाशिकमध्ये पोलिसांची दारूपार्टी होते, नागरीकांना पोलिस मारहाण करतात.
  • अजित पवारांचा संपर्क क्रमांक फोर्स करून खंडणीचा प्रकार पुण्यात झाला.
  • २० लाखांची खंडणी मागीतली दोन लाख स्विकारले. पोलिसांनी अटक केली ही वेगळी बाब.
  • फेक माताडी कामगारांना काम न करण्याचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे उद्योजक हातघाईला आले.
  • जितू खाडेने झेडछाड केली पण त्याच्यावर कारवाई होत नाही,
  • साक्रीमध्येही काही परिवार डीजे लावून प्रभू श्रीरामांचे गीत सुरू असताना दगडफेक झाली.
  • पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा नोंदवला, ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना डांबले पण हल्लेखोरांवर कारवाई नाही
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून २००+ इच्छुकांनी दिवसभरात नेले उमेदवारीसाठी अर्ज

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज वाटप – पहिल्याच दिवशी मोठा...

पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची महागर्दी:पहिल्याच दिवशी दोन हजार अर्जांची मागणी…

पुणे- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर भारतीय जनता...

कोरियन सांस्कृतिक महोत्सवाने जिंकली पुणेकरांची मने

फॅशन शो, के-पॉप, फ्यूजन संगीत व कोरियन खाद्य-संस्कृतीच्या स्टॉलना...