ओंकारेश्वराच्या दर्शनाने महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ
पुणे दि. ९ : विरोधी उमेदवाराने वारंवार पक्ष बदलला आहे, त्याची लढाई खुर्चीसाठी, सत्तेसाठीआहे. हेमंत रासने यांचा लढा सत्य आणि विकासासाठी आहे.जनतेच्या सेवेच्या संकल्पनेतून काम करणार्या भाजपला विजयी करा असे प्रतिपादन येथे राज्याचे वनमंत्रीसुधीर मुनगंटीवार यांनी केले.
कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ओमकारेश्वर मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आला झाला. त्यानंतर शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ या परिसरात पदयात्रा काढण्यात आली.
निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ, शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर अध्यक्ष भरत लगड, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील नाईक, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, चिटणीस धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, प्रदेश प्रवक्ता कुणाल टिळक, गौरव बापट, शहर भाजप सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, माजी नगरसेवक गायत्री खडके, अजय खेडेकर, योगेश समेळ, आरती कोंढरे, कसबा भाजपचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस छगन बुलाखे, राणी सोनावणे, राजेंद्र काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले कि,’१९७८ सालापासून एखाद-दुसरा अपवाद वगळला तर कसबा मतदारसंघातील मतदारांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे.सत्य, धर्म, देश, विकासासाठी काम करणार्या विचारांचा विजय झाला आहे.
विरोधी उमेदवाराने वारंवार पक्ष बदलला आहे, त्याची लढाई खुर्चीसाठी, सत्तेसाठी आहे.हेमंत रासने यांचा लढा सत्य आणि विकासासाठी आहे.केंद्र आणि राज्यात भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार आहे.कसब्यातील मतदारांना आवाहन आहे जनतेच्या सेवेच्या संकल्पनेतून काम करणार्या भाजपला विजयी करा.
पुणे देशातील सर्वोत्तम शहर करण्याचे स्वप्न साकार करू -रासने
हेमंत रासने यावेळी म्हणाले,’आजपासून आमचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा शुभारंभ आम्ही करत आहोत.हा शुभारंभ विक्रमी विजयाकडे घेऊन जाणारा आहे.कसबा विधानसभा निवडणुकीत विजय १०० टक्के निश्चितआम्हाला कधीच कोणाची भीती वाटत नाही.जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे हजारो कार्यकर्ते त्याबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही घर आणि घर पिंजून काढणार आहोत.आम्ही केलेल्या विकासाचा अजेंडा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशात, राज्यात आणि शहरात विकास करीत आहोत.पुढील ५० वर्षांतील पुणे शहर हे देशातील सर्वोत्तम शहर करण्याचे देवेंद्रजींचे स्वप्न आहे. या स्वप्नाला पुणेकरांची साथ आहे आणि आम्ही ते पूर्ण करू हा मला विश्वास आहे

