- कंबाईन डिस्ट्रिक्टच्या अभिषेक पवारची शतकी खेळी;
पुणे, दि.13 फेब्रुवारी 2021- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अ गटात डेक्कन जिमखाना संघाने दुसरा, तर ब गटात कंबाईन डिस्ट्रिक्ट संघाने सलग तिसरा विजय नोंदविला.
दापोली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रॉयल गोल्डफिल्ड स्पोर्ट्स क्लबच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या ब गटाच्या लढतीत अभिषेक पवार(132धावा) याने धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर कंबाईन डिस्ट्रिक्ट संघाने अंबिशियस स्पोर्ट्स क्लब संघाचा 37 धावांनी पराभव करत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना कंबाईन डिस्ट्रिक्ट संघाने 40 षटकात 4बाद 232धावा केल्या. यात अभिषेक पवारने अफलातून फलंदाजी करत 125चेंडूंत 14चौकार व 3 षटकाराच्या मदतीने 132धावांची खेळी केली. अभिषेक पवारला किरण चोरमालेने 80 चेंडूत 56 धावा काढून सुरेख साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 174 चेंडूत 154 धावांची भागीदारी करून संघाला 232 धावांचे आव्हान उभे करून दिले. अंबिशियस स्पोर्ट्स क्लबकडून जेसल पटेल(2-42), व्यंकटेश दराडे(1-55), ऋषिकेश बारणे(1-24) यांनी गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना अंबिशियस स्पोर्ट्स क्लबचा डाव 40षटकात 9बाद 195धावावर संपुष्टात आला. यात रोहित हडके 68, दत्ता आर्यन 23, मल्हार वंजारी 23, श्रेयस जाधव 19, सिध्दांत दोशी 18 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. कंबाईन डिस्ट्रिक्ट संघाकडून क्षितीज पाटील 3-24, नचिकेत ठाकूर(2-25), ओंकार पटकल(1-26) यांनी अचुक गोलंदाजी केली.
पूना क्लब मैदानावरील सामन्यात यश बोरामनी(82धावा व 3-47)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने 22 यार्डस संघाचा 2 गडी राखून पराभव केला. डेक्कन जिमखानाच्या यश बोरामनी(3-47), आदर्श नागोजी(2-37), जय पाटील(2-16), अजय बोरुडे(1-19) यांच्या भेदक गोलंदाजीपुढे 22 यार्डस संघाचा डाव 40 षटकात 189 धावावर कोसळला. यात रतन उतुरे 45, श्रेयस केळकर 32, गौरव कुमकर 22, अथर्व शिंदे नाबाद 18, उत्कर्ष चौधरी 15, अभिजीत सावळे 15 यांनी धावा केल्या. 189 धावांचे आव्हान डेक्कन जिमखाना संघाने 43.5षटकात 8बाद 191धावा करून पूर्ण केले. यात यश बोरामनीने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही कमाल करत 114 चेंडूत 11चौकार व 1षटकारासह 82धावांची संयमी खेळी केली. यश बोरामनीने रुद्रज घोसले(18धावा)च्या साथीत 63 चेंडूत 42धावांची भागीदारी केली. त्यानंतर डेक्कन जिमखाना संघ 41.1षटकात 8बाद 171 असा अडचणीत असताना मानस कोंढरे(नाबाद 13धावा) व हितेन बनसोडे(नाबाद 11)यांनी आठव्या गड्यासाठी 16 चेंडूत 20 धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
गट अ: 22 यार्डस: 40 षटकात सर्वबाद 189 धावा(रतन उतुरे 45(50,7×4), श्रेयस केळकर 32(44,6×4), गौरव कुमकर 22(45,2×4), अथर्व शिंदे नाबाद 18, उत्कर्ष चौधरी 15, अभिजीत सावळे 15, यश बोरामनी 3-47, आदर्श नागोजी 2-37, जय पाटील 2-16, अजय बोरुडे 1-19) पराभूत वि.डेक्कन जिमखाना: 43.5षटकात 8बाद 191धावा(यश बोरामनी 82(114, 11×4,1×6), अजय बोरुडे 23(40,3×4), रुद्रज घोसले 18, अथर्व वणवे 12, तेजस तोलसणकर 2-31, अमन मुल्ला 1-13, अभिजीत सावळे 1-12);सामनावीर-यश बोरामनी; डेक्कन जिमखाना 2 गडी राखून विजयी;
गट ब: कंबाईन डिस्ट्रिक्ट: 40 षटकात 4बाद 232धावा(अभिषेक पवार 132(125,14×4,3×6), किरण चोरमाले 56(80,7×4), सचिन धास 23(26,1×4,1×6), जेसल पटेल 2-42, व्यंकटेश दराडे 1-55, ऋषिकेश बारणे 1-24) वि.वि.अंबिशियस स्पोर्ट्स क्लब: 40षटकात 9बाद 195धावा(रोहित हडके 68(54,2×4,6×6), दत्ता आर्यन 23(21,3×4), मल्हार वंजारी 23, श्रेयस जाधव 19, सिध्दांत दोशी 18, क्षितीज पाटील 3-24, नचिकेत ठाकूर 2-25, ओंकार पटकल 1-26);सामनावीर-अभिषेक पवार; कंबाईन डिस्ट्रिक्ट 37 धावांनी विजयी.

