कालच्या तुलनेत आज पुणे विभागातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
पुणे-कालच्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत आज पुणे विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 862 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयात 509, सातारा जिल्हयात 134, सोलापूर जिल्हयात 159, सांगली जिल्हयात 29, कोल्हापूर जिल्हयात 31 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.विभागामध्ये काल दि.14/11/2020 रोजी बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकुण 784 आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयात 475, सातारा ज़िल्हयामध्ये 36, सोलापूर ज़िल्हयामध्ये 143, सांगली ज़िल्हयामध्ये 71 व कोल्हापूर ज़िल्हयामध्ये 59 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 331089 झाली आहे. 313719 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9299 आहे. पुणे जिल्हयात कोरोना बाधीत एकुण 8071 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.75 टक्के आहे.
पुणे विभाग
विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 517624 झाली आहे. विभागातील 487811 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15233 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 14580 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के इतके आहे. पुणे विभागामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.24 टक्के आहे.
पुणे विभाग सर्वेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2587166 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 517624 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (Positive) आहे.

