शहरे सुरक्षित करण्यासाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग’चा पर्याय स्वीकारण्याची गरज

Date:

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारलेला व्हाट्सऍप चॅट बॉट‘ उपक्रम इतर महापालिकांमध्ये राबविण्यासाठी शासन सकारात्मक

मुंबईदि.21 :- शहरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी ईज ऑफ लिव्हिंग‘ उपक्रमात सुचवण्यात आलेले उपाय राज्यातील सर्व महानगरपालिकामध्ये राबवण्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. हे उपाय शहरांचे रूप पालटून टाकण्यासाठी अत्यंत आवश्यक असून त्यासाठी गरज वाटल्यास या महानगरपालिकांना नगरविकास विभागाच्या वतीने आर्थिक मदत देण्याची तयारीही  त्यांनी दर्शवली.

 नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने

व्हाट्सऍप चॅट बॉट आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटद्वारे सुरक्षित शाळा उपक्रमांचे ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहलनगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासह राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आठ दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्हाट्सएप चॅट बॉट या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले आहे. या नवीन सुविधेमार्फत तब्बल 80 सुविधा चॅट बॉटच्या माध्यमातून नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेला हा प्रकल्प इतर महानगरपालिकांनी देखील राबवावा यासाठी आज या सुविधेचे सादरीकरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या चॅटबॉटमुळे उत्तम सेवा नागरिकांना पुरविता येणार असून त्यामुळे कामकाजाला गती मिळेलशिवाय पारदर्शकता वाढीस लागणार असून नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून हे चॅटबॉट जनतेला सुविधा देण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  जवळपास दोन वर्षांपासून कोविड-19 महामारीमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करीत आहोत. मात्र या काळातही नागरिकांना घरबसल्या आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा प्रकल्प नक्कीच सर्व महानगरपालिकांसाठी पथदर्शी ठरणार आहे. पारदर्शकतातत्परता याबरोबरच शासनाप्रती विश्वासार्हता वाढविण्यासाठी हा प्रकल्प नक्कीच महत्त्वपूर्ण असेलअसे नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले.

तर दुसरीकडे राज्याचे वेगाने नागरीकरण होत असताना होणारा विकास हा शाश्वत व्हावा तसेच इज ऑफ लिव्हिंगमध्ये तो बदलण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाचा आढावा वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट या संस्थेने सादर केलेल्या सादरीकरणातून मांडण्यात आला. शहरातील शाळेचा परिसर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित करण्यासाठी अनेक संकल्पना यावेळी सादर करण्यात आल्या. या संकल्पना अत्यंत साध्या आणि सोप्या असून त्याद्वारे शहरांतर्गत नागरिकांची सुरक्षितता वाढणार आहे. असे प्रकल्प राज्यातील महानगरपालिकामध्ये राबवणे शक्य असून त्यासाठी टप्प्याटप्प्याने कालबद्ध रीतीने काम करावे लागणार आहे. त्यासाठी नगरविकास विभाग पुढाकार घ्यायला तयार असून महानगरपालिकाना काही निधी द्यायला देखील तयार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. आज सादर झालेल्या या संकल्पनांचे  नगर रचनाकारांच्या मदतीने शैक्षणिक संस्थांच्या परिसर सुरक्षित करण्यासाठी काम करावे असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...