हसन मुश्रीफांनी बंद पडलेल्या कंपनीच्या नावे काेट्यवधी लाटले- किरीट सोमय्या

Date:

पुणे: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोगस कंपन्या उघडल्या आहेत. निती आयोगाकडून ग्रामपंचायतींसाठी थेट येणाऱ्या दरवर्षीचा १५०० कोटी रूपयांचाच्या निधीचे कॉन्ट्रॅक्ट परस्पर स्वत:च्या जावायला दिले आहे. दहा वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या नावाने बोगसपणे कोट्यवधींचे व्यवहार केले आहेत. मुरगुड पोलीस ठाण्यातील गुन्हा पुणे परिक्षेत्राच्या लाचलुचपत विभागात वर्ग करण्याची ठाकरे-पवारांची चालाखी चालणार नाही. मुश्रीफ परिवारावर कोल्हापुरातील मुरगुड ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तेथेच कारवाई करा, अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष, प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी येथे केली.

पुणे परिक्षेत्राचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांची पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात भेट घेऊन यासंदर्भातील आपल्या मागण्या सादर केल्या आहेत. तसेच हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात पुरावे सादर केल्याचे किरीट सोमय्या यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा चलाखी करत आहेत. ते चालणार नाही. मागील काही काळापासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर पुन्हा आरोप केले आहेत. मुश्रीफांच्या मुलाने बोगस बँक अकाउंट उघडले. या अकाउंटमध्ये ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत. तेथूनच कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केल्याचा दावा करत हा आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले.

वळसे-पाटील यांनी बनवाबनवी कमी करावी

जी कंपनी १० वर्षांपूर्वी बंद झाली आहे. त्या कंपनीच्या नावे कोट्यवधी रुपये हसन मुश्रीफ यांनी लाटले आहेत. दिलीप वळसे-पाटील यांनी बनवाबनवी कमी करावी. आता मी मुश्रीफांच्या जावयाविरोधात तक्रार दिली आहे. त्यावर लवकरच कारवाई होईल, असेही सोमय्या म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पण सरकार शरद पवार चालवतात

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी सरकार चालवणारे राष्ट्रवादीचे शरद पवार हेच आहेत. जर मी काही गुन्हा केला असेल तर त्यांनी माझ्यावर कारवाई करावी. त्यांना कोणी अडवले आहे. त्याचबरोबर राज्यातील कुणीही चुकीची कामे केली असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...