पिरनवाडीत अखेर लागला ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ नावाचा फलक-जल्लोषात अनावरण

Date:

बेळगाव -आज पिरनवाडीत सकाळी शिवप्रेमींनी चौकात भव्य अशा “छत्रपती शिवाजी महाराज चौक” नामफलकाचे अनावरण केले. यावेळी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवरायांच्या नामाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.

या प्पिरसंगामुळे येथील पुतळ्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावर पडला आहे असे मानले जाणार आहे . चौकाला छत्रपती शिवरायांचेच नाव कायम राहील अशी भूमिका कर्नाटक सरकारने घेतली. यानंतर पिरणवाडी येथील शिवाजी चौकात ग्रामस्थांनी आणि युवा कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाचा भव्य फलक उभारुण आज जल्लोष केला. हर हर महादेव गजर आणि शिवरायांचा जयजयकाराने परिसर दणाणून गेला. आता मनगुत्तीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पुन्हा सन्मानाने कधी विराजमान होणार याकडे सर्व शिवप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.

पिरनवाडी येथील चौकात ग्रामस्थांच्या मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा चौक वर्षानुवर्षे छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून ओळखला जातो. पण काही कानडी संघटनांनी गेल्या आठवड्यात या चौकात क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा अचानक रातोरात बसवून, मराठी विरुद्ध कानडी असा वाद निर्माण केला. दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याने, येथे काही दिवसांपूर्वी तणाव निर्माण झाला होता. यानंतर लगेचच पिरनवाडीत घडलेल्या प्रकाराने सीमाभागात वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.

या सर्व प्रकरणाची कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दखल घेत, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमर कुमार पांडे यांना बेळगावला पाठवले होते. त्यांनी घेतलेल्या दोन्ही गटांच्या बैठकीत क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा सध्या आहे, त्याच ठिकाणी बसवायचा आणि चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव द्यायचे असा तोडगा काढला होता. त्यानुसार आज उत्सवी वातावरणात कार्यवाही करण्यात आली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...