पालिकेने आणखी २२ ठिकाणे सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविला

Date:

पुणे : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य आजारामुळे पुणे शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या मध्यवस्तीला पालिकेने सील केले असून याभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पालिकेने आणखी २२ ठिकाणे सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठविला असून जिल्हाधिकाऱ्यांकडून याविषयी आदेश काढण्यात येणार आहे.
यापूर्वी शहरातील कोंढवा परिसर व सर्व पेठांचा परिसर (महर्षी नगर ते आरटीओ कार्यालय)सील करण्यात आलेला आहे. शहरातील काही विशिष्ट परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आणखी २२ ठिकाणांवर सील करणे आवश्यक असल्याचे पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
* ही आहेत नव्याने प्रस्तावित केलेली ठिकाणे :
१) प्रायव्हेट रोड पत्रा चाळ, लेन क्र.१ ते ४८ व परिसर, ताडीवाला रोड प्रभाग क्र.२०
२) संपूर्ण ताडीवाला रोड
३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर प्रभाग क्र. २
४) राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टॅन्ड, संत कबीर, अ. ऊ. कॅम्प चौक, क्वॉटर गेट, भवानी पेठ प्रभाग क्र.२०
५) विकास नगर,बवानवडी गाव
६) लुम्बिनी नगर, ताडीवाला रोड
७) चिंतामणी नगर,बहांडेवाडी रोड प्रभाग. क्र. २६ व २८
८) घोरपडी गाव, इ. ळ. कवडे रोड
९) संपुर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर, येरवडा प्रभाग क्र. ८
१०) सय्यदनगर, महम्मदवाडी-हडपसर प्रभाग क्र. २३, २४ व २६
११) पर्वती दर्शन परिसर,
१२) सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट पुणे-मुंबई रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे रूळ डावी बाजु व उजव्या बाजुस नरवीर तानाजीवाडी चौक ते जुने शिवाजीनगर एसटी स्टॅन्ड, पटेल टाइल्स, विक्रम टाइल्स, इराणी वस्ती सर्व्ह नं. ११ मशिदीचा मागचा परिसर ते रेल्वे भुयारी मार्ग न. ता. वाडी, मनपा शाळा क्रमांक ४७ परिसराच्या दोन्हीबाजू
१३) संपूर्ण पाटील इस्टेट परिसर प्रभाग क्र. १४
१४) संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वाकडेवाडी परिसर प्रभाग क्र. ७
१५) ठकइट रोड कोंढवा प्रभाग क्र. २६
१६) संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर
१७) संपूर्ण कोंढवा बुद्रुक परिसर
१८) साई नगर कोंढवा प्रभाग क्र. २७
१९) संपूर्ण विमाननगर प्रभाग क्र. ३
२०) वडगावशेरी परिसर प्रभाग क्र. ५
२१) धानोरी प्रभाग क्र. १
२२) येरवडा प्रभाग क्र. ६

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

पुणे, दि. 24: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट...

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...