महापालिकेला आज कळले,यंदा पाणी कपातीचे संकट टळले…

Date:

पुणे – पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारीही धरणांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने २० टीएमसीपेक्षा पाणी धरणात जमा झाले आहे. त्यामुळे अगदी तोंडावर येऊन पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट यंदा दूर झाले आहे.खरेतर गतवर्षाच्या पाणी साठ्याची स्थिती आपण ओलांडली तेव्हाच हे स्पष्ट झाले होते , पण आज ,२६ जुलै नंतरही शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात लागू होणार नाही, वर्षभर नियमीत पाणी पुरवठा केला जाईल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले आहे.

जून महिन्यात पावसाने पुणे शहर व खडकवासला धरण प्रकल्पाकडे पाठ फिरवली. त्यामुळे धरणात केवळ २.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. महापालिकेकडून रोज १६०० एमएलडी पाणी धरणातून उचलले जात होते व पाऊस लांबणीवर पडल्याने पाणीसाठा झपाट्याने खाली जात होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने पाण्याचा काटकसरीने वापर करा असे पत्र महापालिकेला पाठवले. यापार्श्‍वभूमीवर महापालिकेने ४ जुलै ते ११ जुलै या दरम्यान एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पावसाला सुरवात झाली.त्यामुळे महापालिकेने ही पाणी कपात ८ जुलै रोजी मागे घेऊन २६ जुलैपर्यंत नियमीत पाणी पुरवठा केला जाईल. २६ जुलैनंतर धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाईल असे स्पष्ट केले होते.

पाणी पुरवठा विभागाने आज धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेतला. त्यामध्ये खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत या चारीही धरणात मिळून २०.०३ टीएमसी म्हणजे ६८.७३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी १४.२३ टीएमसी पाणी होते. पुढील वर्षभर पुणे शहराला पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाल्याने व आखणी अडीच महिने पावसाळा असल्याने महापालिकेने पाणी कपात आज मागे घेतली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...