नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2022
केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी आज मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे मार्गिकेच्या (बुलेट ट्रेन) सूरत आणि वापी दरम्यानच्या बांधकामांचा प्रकल्पस्थळी जाऊन आढावा घेतला.
जरदोश यांनी नवसारी जिल्ह्यातील पडघा गावातल्या चे 243 मधील कास्टिंग यार्ड पासून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यावेळी, 242 P42 आणि P23 या कास्टिंग साठी तयार केलेल्या कामांचा आढावा घेतला.
दौऱ्याच्या दुसऱ्या टप्पात, त्यांनी कास्टिंग यार्ड (नसीलपोर, जिल्हा नवसारी) इथल्या चेसिस 238 चा आढावा घेतला. त्यांनी तिथे, 1100 टी आणि पूलाच्या पायाच्या बांधकामाचा आढावा घेतला.
त्यानंतर, कास्टिंग यार्ड 232 (काछचोल, जिल्हा नवसारी) इथे संपूर्ण ग्रीन्डरचा आढावा घेतला. तसेच वलसाड जिल्हयात तयार स्टील प्लांट, स्टीलचे स्वयंचलित कटींग आणि रिंग तयार करणे,चेसिस 197 ते 195 विद्युत पीयर्सच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.
दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, त्यांनी दमण गंगा नदीकिनारी जाऊन, नदीवर बांधल्या जात असलेल्या पूलाच्या पायाच्या कामाचा आढावा घेतला.
अतिरिक्त माहिती :
मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे मार्गाच्या बांधकाम कामांची काही ठळक वैशिष्ट्ये :
- गुजरात राज्यात (352 किमी), 100% सिव्हिल बांधकाम निविदा भारतीय कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत.
- 98.6% जमीनीचे भूसंपादन झाले आहे, आणि संपूर्ण 352 किमीच्या कामाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
- गुजरात राज्यात, (352 किमी), 98.6% जमीन संपादित करण्यात आली आहे आणि संपूर्ण 352 किमीचे बांधकाम सुरु झाले आहे. महाराष्ट्रात, 62% भूसंपादन झाले आहे.
- स्तंभ, पाया, पियर्स, पियर्स कॅप्स, कास्टिंग आणि विद्युत तसेच स्थानकांसाठीच्या ग्रीन्डर साठीचे खोदकाम सुरु झाले आहे. गुजरातमधील आठही जिल्ह्यात हे काम सुरु आहे.
- 352 किमी पैकी, 325 किमीच्या मार्गाचे भू-तांत्रिक सर्वेक्षण काम पूर्ण झाले आहे.
- भू तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी, सूरत इथे एशियातील सर्वात मोठी भू-तंत्रज्ञान प्रयोगशाळा विकसित करण्यात आली आहे.
- 110 किमी मार्गावर पाइल्स, पाइल्स कॅप्स, मुक्त पाया, विहीरीचा पाया, पियर्स आणि पीयर्स कॅप्स चे बांधकाम सुरु आहे.
- 352 किमीपैकी, 81 किमीवरील पाईलीगचे कां पूर्ण झाले आहे तर 30 किमीवर पाया पूर्ण झाला असून 20 किमी अंतरावरील पीयरचे काम पूर्ण झाले आहे.


ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे 18 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 4:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ठाणे आणि दिवा या स्थानकांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित करणार आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांनाही ते हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर ते उपस्थिताना संबोधितही करतील
ठाणे जिल्ह्यातील कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. देशाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक कल्याण येथे एकत्रित येवून पुढे मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) च्या दिशेने रवाना होते. कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या चार मार्गांपैकी दोन मार्ग धीम्या लोकलसाठी आणि दोन मार्ग जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात येत होते. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्याची वाहतूक स्वतंत्रपणे करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन करण्यात आले.
ठाणे आणि दिवा यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहेत आणि त्यात 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, 3 मोठे पूल, 21 छोटे पूल आहेत. या मार्गांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीतील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होईल. तसेच या मार्गांमुळे शहरात 36 नवीन उपनगरीय गाड्या सुरू करता येतील.

