चंद्र आहे साक्षीला…

Date:

चांदोबा – चांदोबाची आकाशात पहिल्यांदा कधी भेट झाली ते आठवत नसले तरी, त्या क्षणापासून तो आपला जिवलग मात्र झाला. आपल्याकडे बघून हसतोय असं कायम वाटायचं आणि आजही वाटतं. चांदोबावर असणारे काळे डाग कधी झाड वाटले तर कधी इटुकला ससा असल्याचा भास झाला. त्या चांदोबाला तासन् तास बघत बसणं हे खूप आनंददायी होतं आणि आज सुद्धा आहे.

‘चांदोबा चांदोबा
भागलास का,
निंबोणीच्या झाडामागे
लपलास का…’

प्रत्येकाच्या आवडीचं हे चांदोबाचं बालगीत गदिमांच्या लेखणीतून किती सुरेख उतरलंय! चांदोबाची गाणी आणि गोष्टी ऐकताच आपले बालपण समृद्ध झाले. चांदोबा नेहमी जवळचा वाटला. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने चांदोबाशी आपल्या परीने नाते जोडले.

‘निंबोणीच्या झाडामागे…चंद्र झोपला गं बाई,
आज माझ्या पाडसाला, झोप का गं येत नाही’ –

आपल्या बाळाला झोपविण्यासाठी माऊलीने हे अंगाईगीत गाईले. मधुसूदन कालेलकरांचं एक अप्रतिम अंगाईगीत, आजही तितकेच लोकप्रिय आहे.

जन्मजन्मांतरी प्रेमाचा साक्षीदार तर चांदोबा आहेच की. आपल्या प्रेमासाठी त्याची साक्ष ही महत्त्वाची. जगदीश खेबूडकरांनी भावगीतातून ते पटवून दिले –
‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला,
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला…
चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला,
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला…’

या चंद्रास साक्षी ठेवून प्रेमी युगलांनी आपले प्रेम फुलवले आणि आणाभाका घेतल्या.

अर्थात या भेटीतही कधी तरी कुणाला अपूर्णता जाणवली. अशाच एका प्रेयसीची आर्तता, तिची हुरहूर दाखवताना मधुकर जोशी यांनी आपल्या भावगीतातून तिचे मनोगत व्यक्त केले –
‘चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली,
भेट अर्धी गीत अर्धे प्रीत अर्धी राहिली…’

तर कुसुमाग्रजांनी लिहिलेले आणि अभिषेकी बुवांनी स्वरसाज चढवलेले गाणे म्हणजे कळसाध्यायच!
‘हे सुरांनो, चंद्र व्हा…
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहोचवा’ –

या गाण्यातून चंद्राचा एक वेगळाच साक्षात्कार होतो.

कविवर्य मंगेश पाडगावकरांनी मिश्कीलपणे चांदोबाला शाळेत नेऊन बसविले आणि थेट प्रश्नांची सरबत्ती केली –
‘चांदोमामा चांदोमामा…भागलास काय?
घरचा अभ्यास केलास काय?
चांदोमामा चांदोमामा लपलास काय?
पुस्तक हरवून बसलास काय?’

चाचा चौधरी, चंपक किंवा चांदोबा…ही कॉमिक बुक्स लहानपणी वाचली नाहीत, असं सांगणारा विरळाच. ‘चांदोबा’ म्हणजे सगळ्यांचंच आवडतं गोष्टीचं पुस्तक आणि त्यातील आवडती गोष्ट म्हणजे ‘विक्रम आणि वेताळ’. दर महिन्याला घरी येणाऱ्या चांदोबाची आतुरतेने वाट पाहिली जायची. कधी एकदा वाचून त्याचा फडशा पाडतो, असं झालेलं असायचं.

चांदोबा प्रत्येकाचाच अगदी जिवाभावाचा आणि जवळचा. आजही एखादे बाळ रडत असेल तर आई सांगेल – तो बघ चांदोबा, तुझ्याकडे बघून हसतोय. कधी तो पुन्हा निंबोणीच्या झाडामागे लपेलही. तर बहीण आपल्या भावाला सांगेल –
‘गोरी गोरी पान फुलासारखी छान,
दादा मला एक वहिनी आण…
वहिनीला आणायला चांदोबाची गाडी,
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी…’

या चांदोबाचं प्रत्येक वयोगटाला आकर्षण आहे. तो नक्की कसा आहे, त्यावर आहे तरी काय याचा शोध नेहमीच घेतला जातो. नील आर्मस्ट्राँग हा पहिला अंतराळवीर ज्याने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते, त्या घटनेला तब्बल ५० वर्षं होऊन गेलीत.

रितू क्रिधाल आणि वनिथा मुथय्या यांना लहानपणापासूनच चांदोबाबद्दल विलक्षण कुतूहल. बालपणीचा मित्र चांदोबा ते भविष्यातील प्रेरणादायी चंद्र ही यशस्वी वाटचाल करणाऱ्या या चंद्रवेड्या अवकाशकन्या!

केवळ अंतराळवीरांनाच नाही तर सगळ्यांनाच या चंद्राचं कुतूहल आहे. आजही रात्रीच्या वेळी आकाशात चंद्र दिसला की त्याला बघताना आपण हरवून जातो; ढगाआड लपला की तो पुन्हा दिसेपर्यंत व्याकुळ होतो. दूर तिथे आकाशात असला तरी आपल्या सर्वांनाच कायम जवळचा वाटणारा हा चांदोबा आपल्या सुख-दुःखाच्या प्रवासाचा साक्षीदार असतो.

© पूर्णिमा नार्वेकर, दहिसर,मुंबई

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...