पुणे शहरात आज दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसा दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने मंगळवार पेठ परिसरात मोबाईल टॉवर कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत सजीव हानी झाली नसल्याचे समजत आहे.
कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या घटकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. पोलिसांना ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता लॉक डाऊन चा बंदोबस्त करावा लागतोय ,तर पत्रकार आणि छायाचित्रकार देखील वार्तांकन करताना दिसतात. बंद केलेल्या रस्त्यावर उन्हात उभे राहण्या ऐवजी तात्पुरते छत लावून बंदोबस्ताला बसणाऱ्या पोलिसांची आज पावसाने आणि वादळाने मोठी तारांबळ उडविली ,पावसात विश्रामबागवाड्यासमोर दिसलेलं या व्हिडीओतील दुसरे चित्र ….


