विजेचे अपघात व आगीच्या घटना टाळण्यासाठी कोव्हिड रुग्णालयातील विद्युत संच मांडणीचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे ऊर्जामंत्री यांनी दिले निर्देश

Date:

  • मुख्य विद्युत निरीक्षकांनी जारी केले आदेश व निरीक्षणासाठी एसओपी.
  • उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या आदेशानंतर कोव्हिड रूग्णालयांच्या विद्युत निरीक्षणास सुरूवात.

मुंबई : शॉर्टसर्किटमूळे व चुकीच्या विद्युत संच  मांडणीमुळे होणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी सार्वजनिक व खाजगी कोव्हिड रुग्णालयाच्या विद्युत संच मांडणीचे  व उदवाहनाचे(लिफ्ट्स) निरीक्षण (इलेक्ट्रिकल  सेफ्टी इंस्पेक्शन) करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी  दिल्यानंतर आता राज्यात या तांत्रिक निरीक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेत.  राज्यातील सर्व विद्युत आणि उद्वाहन निरिक्षकांना कोरोनाविषयक खबरदारी घेऊन लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठीची आदर्श अमंलबजावणी प्रक्रिया (एसओपी)ही जारी करून चेकलिस्ट सर्वांना कळविण्यात आली आहे.

उर्जा मंत्र्यांच्या आदेशानंतर ऊर्जा विभागाने या संदर्भात २६ एप्रिल एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकाच्यानंतर  राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक दिनेश खोंडे यांनी राज्यातील सर्व विद्युत निरिक्षकांशी व्हीसीद्वारे या विषयावर सखोल चर्चा केली. कोरोनाविषयक खबरदारी घेऊन रूग्णालयांचे हे निरीक्षण कसे पार पाडता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली. यासाठी स्थानिक यंत्रणा व  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांना विश्वासात घेण्याचे निर्देशही  उर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत. उर्जामंत्र्यांच्या या सूचनांवर या बैठकीत चर्चा झाली.  मुख्य विद्युत निरीक्षक खोंडे यांनी सर्व विद्युत निरीक्षकांना  २८ एप्रिल रोजी एक पत्र पाठवून हे निरीक्षण कसे पार पाडायचे याबद्दल विस्तृत सूचना केल्या आहेत. रूग्णालये व लिफ्टस् यांचे निरीक्षण येत्या १० दिवसात पूर्ण  करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

“राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्युत उपकरणांमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे रुग्णालयामध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या असून यात जीवित व वित्त हानी झाली आहे.  तसेच कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील खाजगी व सार्वजनिक रुग्णालयावर ताण निर्माण झालेला आहे. त्यामुळे अश्या ठिकाणी विजेचे अपघात व आग लागण्याची घटना घडू शकते. हे टाळण्यासाठी या प्रकारच्या निरीक्षणाचे निर्देश दिले आहेत. या निरिक्षणाबाबत आणि निरीक्षणात काही त्रुटी आढळल्यास त्याची माहिती संबंधित आपत्ती व्यवस्थापन समितीला कळवावे आणि या त्रुटीची पूर्तता केली जात आहे की नाही याची खातरजमा त्यांच्या पातळीवरही करून घेण्याची विनंती करावी,अशा सूचनाही मी दिल्या आहेत,” असे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

“ निरीक्षण करताना कुणला त्रास देणे वा कोणत्या रूग्णालयाला लक्ष्य करणे हे उद्दिष्ट नसून या रूग्णालयातील लोकांच्या जीविताला वीजविषयक दुर्घटना घडून कोणतीही हानी होऊ नये,यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अनेक रूग्णालये मुळात छोटी रूग्णालये म्हणून सुरू झाली. अचानक कोरोना रूग्ण वाढल्यामुळे त्यांना बेड वाढवावी लागली. तसेच काही कोरोना रूग्णालये घाईघाईत उभी करावी लागली. अशा रूग्णालयात विद्यमान क्षमतेनुसार त्रुटी आढळल्यास त्यांच्याबाबत कारवाईचा दृष्टीकोन न ठेवता या त्रुटी दूर करण्याबाबत  रूग्णालय प्रशासनाला विश्वासात घेऊन त्यांना सूचना देण्यात याव्यात तसेच स्थानिक प्रशासनाला या त्रुटीची पूर्तता करण्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंतीही करण्यात यावी, ’’ अशा सूचना खोंडे यांनी आपल्या व्हिसीमध्ये सर्वांना दिल्या आहेत.

“ मात्र  सर्वच कोव्हिड रूग्णालयांमध्ये कोणत्याही कारणाने वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनरेटरची व्यवस्था असणे बंधनकारच आहे. अशी व्यवस्था नसेल तर विद्युत निरीक्षक म्हणून कोव्हीड सेटंरला परवानगी देऊ नका,” अशा सूचनाही संबंधितांना दिल्याचे खोंडे यांनी सांगितले.

 त्यामुळे राज्यातील सार्वजनिक व खाजगी रुग्णालयातील विद्युत यंत्रणेचे निरीक्षण करून त्याबाबतचे अभिप्रायासह अहवाल संबंधित आस्थापणेस कळवून त्याचे निराकरण केल्यास विद्युत यंत्रणेमुळे होणारे अपघात टाळणे शक्य होईल. तसेच सदर ठिकाणाच्या उदवाहनाचे निरीक्षण करणेही आवश्यक राहणार आहे,असे आदेश ऊर्जा विभागाने दिले आहेत. 

 “महानगरांमध्ये १५ मीटरपेक्षा उंच इमारतीत रूग्णालय असेल तर संबंधित मनपाच्या हायराईज समितीचे, विद्युत निरीक्षकाचे, अग्नीशमन विभाग यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. अनेकदा रूग्णालये विविध कारणांमुळे हे प्रमाणपत्र घेण्याचे टाळतात. मात्र यानिमित्ताने निरिक्षण होते तेव्हा विद्युत मांडणी व लिफ्टसमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याची संधी प्राप्त होते व भविष्यातील अपघात टाळणे शक्य होते. संबंधित रूग्णालयांनी जर असे उचित ना-हरकत प्रमाणपत्रे प्राप्त करून घेतली नसेल तर ती प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्नही आम्ही करणार आहोत. याशिवाय संबंधित रूग्णालयांमध्ये विद्युत, ऑक्सिजन यंत्रणा यात बिघाड झाल्यास तात्काळ तो दूर करण्यासाठी संबंधित रूग्णालयात  तांत्रिक कर्मचारी २४ तास उपस्थित रहायला हवेत, अशा सक्त सूचनाही या निरीक्षणादरम्यान रूग्णालयांना देण्यात येतील,” असेही खोंडे यांनी सांगितले.

शासकीय रुग्णालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत शाखेचे अधिकारी यांचे साह्य घेण्यात येणार आहे.

“ सोबत जोडलेल्या तपासणी सूचीनुसार विद्युत संचमांडणीचे निरीक्षण सर्व विद्युत निरिक्षकांनी व उद्धवाहनांचे निरीक्षण  उद्वाहन निरीक्षकांनी पार पाडावे. सार्वजनिक कोव्हिड सेंटर्स असलेल्या रूग्णालयांची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभाग यांचे अखत्यारित येत असल्याने विद्युत  व उद्धवाहन निरीक्षक यांनी सांबा(विद्युत) विभागाच्या अधिका-यांसमवेत समन्वय ठेवून निरीक्षणे पार पाडावीत. याकरिता साबां(विद्युत) विभागाने सहकार्य करणे अभिप्रेत आहे.

विद्युत  व उद्धवाहन निरीक्षक यांनी याबाबत कुठलीही अडचण वाटल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करावा,” असे मुख्य विद्युत निरीक्षकांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

अशी होईल तपासणी

राज्यातील विविध रूग्णालयात एसी यंत्रणेत शॉर्टसर्किट होऊन आयसीयु कक्षात आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आयसीयु कक्षातील अंतर्गत वायरिंग कशा प्रकारची आहे, ती सुस्थितीत आहे की नाही, आयसीयु कक्षात फाल्स सिलिंग केले आहे का, या कक्षातील एसी यंत्रणा स्प्लीट, विंडो, कॅसेट वा सेंट्रल लाईन एसी युनिट यापैकी कोणत्या प्रकारची आहे , एसी यंत्रणेचे आऊटडोअर यंत्रणेचे आउटडोअर युनिट योग्य ठिकाणी बसवलेले आहे का, त्याचे कॉपर ट्युबिंग व्यवस्थित आहे का, आयसीयु कक्षाच्या आकारमानानुसार एसीयंत्रणा पुरेशी आहे का, या यंत्रणेला आवश्यक असलेला वीज भार देण्यात आले आहे का याशिवाय विविध घटकांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशांत जगताप यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष...

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...