मुंबई- महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकरयांनी यांच्या हस्ते गुरुवारी कोकणातील नुकसानग्रस्त लोकांच्या मदतीसाठी 8 हजार किलो रेशन साहित्याचे ट्रक रवाना करण्यात आले. महापौर बंगल्यावर राजस्थानी वेलफेअर असोसिएशनाच्या वतीने मदत साहित्य पाठविण्यात आलेल्या या प्रसंगी बोलतांना राजस्थानी वेल्फेअर असोसिएशनचे प्रमुख सुखराज नाहर म्हणाले की, संकटकाळात आपल्या बांधवांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. असोसिएशनाच्या या मदत साहित्यामध्ये जीवनावश्यक वस्तुंचे समावेश आहे. महापौर श्रीमती किशोरी पेडणेकरयांनी या सहकार्यासाठी संस्थेचे कौतुक केले.


