पुणे- रोज दहा लाखाच्या वसुलीचे उद्दिष्ट्य देणारे ‘ते’ म्हणजे सोशल मिडिया वर व्हायरल झालेले आदेश रद्द केल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीत करत या कृतीबाबत त्जाग्ताप यांच्याकडून तातडीने खुलासा मागविला आहे.
या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले कि,’ आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त माधव जगताप यांना सदर आदेश ताबडतोब रद्द करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत़. तसेच मास्क न लावणे, सोशल डिस्टसिंग न पाळणे आदी कारणातून दिवसाला दहा लाख रूपये दंड वसुलीचे उद्दिष्ट कशाच्या आधारे दिले, याचा खुलासाही त्यांच्याकडून मागविण्यात आला आहे़.