मुंबई-स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षजयंत पाटील यांनी स्वागत केले. या आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही होता तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली. यासाठी बांठिया कमिशन हे महाविकास आघाडी सरकारने नेमले गेले, असे त्यांनी सांगितले. या आयोगाकडून सादर करण्यात आलेला अहवाल सुप्रीम कोर्टाने मान्य केला आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहीत होत आहेत. महाराष्ट्र निवडणुक आयोगाने ताबडतोबीने राज्यात निवडणुका घोषित कराव्या, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र निवडणुक आयोगाने ताबडतोबीने राज्यात निवडणुका घोषित कराव्या-राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी
Date:

