‘दररोज एक प्रश्न खगोलशास्त्रा’चा या उपक्रमाचा सलग एक हजार दिवसांचा प्रवास

Date:

पुणे, ता. 27 जून :  खगोल विज्ञानातील अद्याप न सुटलेली कोडी सोडवण्यासाठी ‘मिशन आदित्य’ ही भारताची मोहीम यशस्वी ठरणार आहे. त्यातून  मोठी माहिती उपलब्ध होणार असून, त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे मत शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अण्ड ट्रेनिंग इनस्टिट्यूट’च्या (जेआरव्हीजीटीआय) वतीने टिळक रस्तावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील तारांगणामध्ये गेली आठ वर्षे आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्राचे अभ्सास वर्ग घेतले जातात. या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘दररोज एक प्रश्न खगोलशास्त्रा’चा या उपक्रमाचा सलग एक हजार दिवसांचा प्रवास पूर्ण झाला. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. रानडे बोलत होते. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले, तारांगणाचे विभाग प्रमुख विनायक रामदासी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पार्श्वभूमी
तारांगणात खगोलशास्त्राचे वर्ग घेण्यात येतात. दर महिन्याला साधारणपणे दोन व्याख्याने, निरीक्षण आणि कृती असा अभ्यासक्रम असतो. विद्यार्थ्यांशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी १ ऑक्टोबर २०१८ पासून दररोज विभाग प्रमुख विनायक रामदासी संध्याकाळी सात वाजता व्हाटसअपच्या ग्रुपवर एक वस्तुनिष्ठ प्रश्न पाठवितात. विद्यार्थी त्याची उत्तरे रामदासींच्या वैयक्तिक मोबार्इलवर पाठवतात. या उपक्रमाला एक हजार दिवस पूर्ण झाले.
रामदासी म्हणाले, ‘ही प्रेरणा शास्त्रज्ञ डॉ, जयंत नारळीकर यांच्या मुलाखतीतून घेतली. त्यांचे मामा दररोज एक गणित फळ्यावर लिहून ठेवत असत आणि नारळीकर ते सोडवत असत. ही आठवण नारळीकर सरांनी ऑगस्ट २०१८ च्या साहित्य परिषदेतील एका कार्यक्रमात बोलताना सांगितली होती. त्याचे आम्ही अनुकरण केले. या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर डॉ. नारळीकरांची भेट घेऊन त्यांना उपक्रमाबद्दल सांगितले. सरांनी विद्यार्थ्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी आयुकाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...