आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने अधिकृत भागीदार म्हणून केली अपस्टॉक्सची निवड

Date:

·         २०२३ च्या वर्षअखेरीपर्यंतच्या आयसीसीच्या सगळ्या कार्यक्रमात ही भागीदारी राहणार

मुंबई, १७ जून २०२१: आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) भारतातल्या सर्वात मोठ्या गुंतवणूक व्यासपीठांपैकी एक असलेल्या अपस्टॉक्स (म्हणजेच आरकेएसव्ही सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) बरोबर महत्वपूर्ण दीर्घकालीन भागीदारी करत असल्याचे आज जाहीर केले. हे संघटन आयसीसीच्या चालू व्यावसायिक हक्क चक्राच्या अखेरीपर्यंत राहणार असून त्याची सुरुवात आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीच्या अंतिम सामन्यापासून होणार आहे. आयसीसीचा जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीचा अंतिम सामना १८ ते २३ जून दरम्यान इंग्लंड मधील साऊथदम्प्टन येथे भारत आणि न्युझीलंड यांच्यात होणार आहे.

२००९ मध्ये आरकेएसव्ही सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून स्थापना झालेल्या अपस्टॉक्सने झपाट्याने प्रगती करत भारतातील सर्वाधिक मोठ्या ऑनलाईन गुंतवणूक व्यासपीठांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला. त्यांचे ४० लाखाहून जास्त ग्राहक असून आयसीसी बरोबर झालेली ही महत्वपूर्ण भागीदारी अपस्टॉक्सला विकासाच्या पुढच्या पायरीवर घेऊन जाईल. आर्थिक गुंतवणूक अधिक सोपी, न्याय्य आणि सर्वांना परवडणारी असावी या त्यांच्या उद्दिष्टाच्या अंमलबजावणीसाठी हे संघटन दीर्घकालीन असावे हा अपस्टॉक्सच्या धोरणाचा केंद्रबिंदू आहे.

या सहयोगाबद्दल बोलताना आयसीसीचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी अनुराग दहिया म्हणाले, “आयसीसीचे अधिकृत भागीदार म्हणून अपस्टॉक्सचे स्वागत करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. जगभरातल्या आमच्या दिमाखदार कार्यक्रमांना प्रचंड मोठा आणि उत्साही चाहतावर्ग आहे. या सहयोगामुळे अपस्टॉक्सला आता असलेल्या आणि जोडीला नव्या ग्राहकांचेही प्रबोधन करण्यासाठी आणि त्यांना स्वतःबरोबर जोडून घेण्यासाठी एक अजोड व्यासपीठ लाभणार आहे. २०२१-२३ या संपूर्ण कालावधीत अपस्टॉक्सच्या विकासाला आमचे पाठबळ राहील. या कालावधीत आयसीसी थोड्या थोडक्या नाही तर पुरुष आणि महिला क्रिकेट मध्ये तब्बल ५ वरिष्ठ पातळीवरील विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार आहे.”

या भागीदारीबद्दल बोलताना अपस्टॉक्सचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, “आयसीसीचे अधिकृत भागीदार झाल्याचा आम्हांला आनंद आहे. क्रिकेट आणि गुंतवणूक क्षेत्राच्या विविध स्वरूपादरम्यान अनेक समांतर गोष्टी आहेत. जसं की क्रिकेटमध्ये सातत्य आणि निश्चयपूर्वक केलेली कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकते त्याचप्रमाणे एक मजबूत गुंतवणूक पोर्टफोलीओ तयार करण्यासाठी गुंतवणुकीतही हेच गुणधर्म लागू पडतात. आयसीसी बरोबर झालेल्या अपस्टॉक्सच्या सहयोगातून आर्थिक जागरूकता पसरण्यात मोलाची भूमिका पार पडेल आणि भारतात इक्विटी गुंतवणूक संस्कृती निर्माण व्हायला मदत होईल. आमच्या तंत्रकुशल आणि ज्ञानाधिष्टीत व्यासपीठाच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त लाभ मिळवून देत सक्षम करण्याची आमची इच्छा आहे.”

आयसीसीचा २०२१ चा जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीचा अंतिम सामना याच्या जोडीलाच या भागीदारी अंतर्गत पुढील कार्यक्रमांचा समावेश आहे: आयसीसीची पुरुष टी २० विश्वचषक स्पर्धा २०२१, आयसीसीची १९ वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२२, आयसीसीची महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२२, आयसीसीची पुरुष टी २० विश्वचषक स्पर्धा २०२२, आयसीसीची महिला क्रिकेट टी २० विश्वचषक स्पर्धा २०२३, आयसीसीचा २०२३ चा जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीचा अंतिम सामना, आयसीसीची पुरुष क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा २०२३ आणि आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३

आयसीसी विषयी:

आयसीसी हे क्रिकेट साठीचे जागतिक पातळीवर प्रशासन करणारे मंडळ आहे. १०५ सदस्यांचे प्रतिनिधित्व असणारी आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती क्रिकेट या खेळाचे प्रशासन सांभाळते. पुरुषांची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, महिलांची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, पुरुष आणि महिला क्रिकेट टी२० विश्वचषक स्पर्धा आणि त्याचबरोबर या सगळ्या स्पर्धांसाठीच्या पात्रता स्पर्धा अशा अनेक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन आयसीसीतर्फे केले जाते.

आयसीसीची आचारसंहिता असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट साठी शिस्त पालन, खेळण्यासाठीची परिस्थिती, गोलंदाजी पुनरावलोकन आणि इतर काही आयसीसी नियम याबद्दल काही व्यावसायिक मापदंड तयार करण्यात आले आहेत. खेळाचे नियम हे भावी यशाचे निदर्शक आहेत.

आयसीसी तर्फे सगळ्या अधिकृत आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, एकदिवसीय सामने आणि टी२० सामन्यांसाठी पंच आणि सामनाधिकारी यांचीही नेमणूक केली जाते. आयसीसी भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या सहकार्याने लाचखोरी आणि मॅच फिक्सिंगच्या विरोधात कारवाई करते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटची गुणवत्ता सुधारणे, अधिक चांगली क्रिकेट व्यवस्था निर्माण करणे, अधिकाधिक लोकांना क्रिकेट कडे आकर्षित करणे आणि या खेळाचा विकास करणे यासाठी आयसीसी विकास विभाग सहयोगी सदस्यांसोबत काम करतो.

अपस्टॉक्स विषयी:

आर्थिक गुंतवणूक अधिक सोपी, न्याय्य आणि सर्व भारतीय गुंतवणूकदारांना सुलभ व्हावी या उद्देशाने अपस्टॉक्सची स्थापना करण्यात आली. गुंतवणुकदार आणि व्यापाऱ्यांसाठी शेअर्स, डेरीव्हेटीव्हज, कमोडिटी, चलन, म्युच्युअल फंड्स आणि इटीएफ मध्ये ऑनलाईन गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देते. इक्विटी डिलिव्हरी ट्रेडस वर शून्य ब्रोकरेज सुविधा आणि इंट्राडे, एफ अँड ओ, कमोडिटी आणि चलन व्यवहारांवर प्रत्येक ऑर्डरसाठी २० रुपये अशा सुविधा देत किमतीच्या बाबतीत संपूर्ण पारदर्शक कारभाराची खात्री देते. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...