H’ness CB350 ने पार केला 10,000 विक्रीचा टप्पा

Date:

गुरुग्राम, 10 फेब्रुवारी 2021 – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. कंपनीने आज H’ness CB350 ने आज भारतात 10,000 विक्रीचा टप्पा पार केल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी 21 ऑक्टोबर रोजी वितरण सुरू झाल्यानंतर होंडाने केवळ तीनच महिन्यांत ही असामान्य कामगिरी केली आहे.

 होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. कंपनीच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘H’ness CB350 चे आधुनिक- अभिजात डिझाइन, अत्याधुनिक वैशिष्ट्ये, सफाईदारपणा आणि बांधणी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे, त्याची गर्जना यांचे खूप कौतुक होत आहे. मर्यादित बिगविंग नेटवर्कमुळे आम्ही अतिशय कमी वेळेत 10,000 विक्रीचा टप्पा पार केला असून काही शहरांतील ऑर्डर्स अजून बाकी आहेत. ग्राहकांनी होंडा ब्रँडवर दाखवलेले प्रेम आणि विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. आम्ही प्रतीक्षएचा काळ कमी करण्यासाठी अजून प्रयत्न करत असून ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी जास्तीत जास्त शहरांत बिगविंग नेटवर्कचा वेगाने प्रसार करत आहोत.

H’ness CB350 – रायडर्सना साद घालणारी गर्जना

मध्यम आकाराच्या 350- 500 सीसी मोटरसायकल क्षेत्रात भव्य पर्दापण करत होंडा टुव्हीलर्स इंडियाने 30 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर H’ness CB350 चे अनावरण केले. लिजेंडरी सीबीप्रमाणे रचना असलेली H’ness CB350 या क्षेत्रात पहिल्यांदाच पाहायला मिळत असलेली पाच वैशिष्ट्ये आणि 9 नव्या पेटंट अर्जांसह रायडर्सना आकर्षित करत आहे.

प्रकारडीएलएक्सडीएलएक्स प्रो
रंगप्रेशियस रेड मेटॅलिकपर्ल नाइट स्टारब्लॅक विथ स्पियरसिल्व्हर मेटॅलिक
पर्ल नाइट स्टारब्लॅकअथलेटिक ब्लू मेटॅलिक विथ व्हर्च्युअस व्हाइट
मॅट मार्शलग्रीन मेटॅलिक मॅट स्टील ब्लॅकमेटॅलिक विथ मॅटमॅसिव्ह ग्रे मेटॅलिक 
किंमतरुपये. 1.86 लाख (एक्स शोरूम पॅन इंडिया) INR. 1.92 लाख (एक्स शोरूम पॅन भारत)

H’ness CB350 साठी खास अक्सेसरीजची श्रेणी

नवी H’ness CB350 चालवण्याचा राजेशाही अनुभव उंचावण्यासाठी 10 पर्यायी अक्सेसरीज तयार करण्यात आल्या असून त्यांच्यामुळे गाडीची एकंदर स्टाइल आणि सौंदर्यात मोलाची भर पडेल. या अक्सेसरीजमधे स्टँड किट, फ्रंट फोर्क बुट किट, सपोर्ट पाइप ए, सपोर्ट पाइप बी, ब्राउन सीट सेट, ब्लॅक सीट सेट, टँक सेंटर या व अशा इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. स्पर्धात्मक किंमत असलेल्या या अक्सेसरीज दर्जाचे सर्व नियम आणि होंडाचे जागतिक दर्जाचे मापदंड यांचे पालन करून बनवण्यात आल्या आहेत. या अक्सेसरीज H’ness CB350 च्या डीएलएक्स आणि डीएलएक्स प्रो अशा दोन्ही प्रकारांसाठी उपलब्ध आहेत.

भारतातील एक्सक्लुसिव्ह होंडा बिगविंग नेटवर्क

प्रीमियम मोटरसायकल ग्राहकांना दर्जेदार अनुभव देण्यासाठी होंडा टुव्हीलर्स इंडिया संपूर्ण देशभरात बिगविंग नेटवर्कचा आक्रमक विस्तार केला जात आहे.

विशेष म्हणजे, मोठ्या शहरांत बिगविंग टॉपलाइन होंडाच्या रिटेल फॉरमॅटचे नेतृत्व करते, तर मागणी असलेल्या इतर केंद्रांमधे बिगविंग कार्यरत आहे. होंडा बिगविंग टॉपलाइनमधे होंडाच्या प्रीमियम मोटरसायकलची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करण्यात आली असून त्यात H’ness CB350, 2020 CBR1000RR-R फायरब्लेड, 2020 CBR1000RR-R फायरब्लेड एसपी आणि अव्हेंचर टुअरर 2020 आफ्राका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्स, होंडा बिगविंग कंपनीच्या मध्यम आकाराच्या मोटरसायकल चाहत्यांसाठीच्या बाइक्सचा समावेश आहे.

2019 मधे उद्घाटन झाल्यापासून भारतातील होंडा टुव्हीलर्स इंडियाचे 5 बिगविंग टॉपलाइन (गुरुग्राम, बेंगळुरू, मुंबई, कोचीन आणि इतर) आणि 18 बिगविंग (भिलाई, बरेली, जबलपूर, सऱ्हाणपूर, कोईम्बतूप, इरोडे, अहमदाबाद (2), रायपूर, जयपूर, त्रिवेंद्रम, गाझियाबाद, रांची, हैद्राबाद, लुधियाना, सिलीगुडी, ठाणे आणि वडोदरा) यांचा समावेश आहे. यानंतर मार्च 2021 पर्यंत होंडा देशातील बिगविंद दालनांची संखअया 50 पर्यंत विस्तारणार आहे.

ग्राहकांना आता होंडाच्या बिगविंग संकेतस्थळावर त्यांची आवडती H’ness CB350 बुक करता येणार आहे. www.HondaBigWing.in . अधिक माहिती व प्रश्नांसाठई मिस कॉल द्या – 9958223388.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब नगरपरिषद निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री अजित...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका: रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदारपुणे :रिपब्लिकन पक्ष हा...