महाड – भंडारा जिल्ह्यातील दहा नवजात बालकांचा मृत्युला सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. कारण त्या रूग्णालयाचे फायर ऑडिड योग्य वेळी झाले असत व येथील व्यवस्था योग्य पध्दतीने ठेवण्यात आली असती तर आज त्या निष्पाप बालकांचा नाहक बळी गेला नसता, त्यामुळे या घटनेतून सरकारने जाग व्हावे अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर रायगडमध्ये ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, भविष्यामध्ये भंडारासारख्या दुर्घटना घडू नये यासाठी ग्रामीण भागातील सर्व रूग्णालयांच्या सुरक्षेचा आराखडा तयार करावा. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय याठिकाणच्या सुरक्षिततेचे पूर्ण मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व रुग्णालयाचे ऑडिट करणे गरजेचे आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील रुग्णालयामध्ये काही सुविधांचा तुटवडा असून डॉक्टर, यंत्रणा उपलब्ध नाहीत त्यामुळे जनतेचा सरकारी रुग्णालयावर विश्वास राहिला नाही. ग्रामीण रुग्णालयात तंज्ञ डॉक्टर, यंत्र सामुग्री नसतील तर त्यांना पुणे व मुंबईतील रूग्णालयामध्ये हलवावे लागते. काल मी बोसेकर रुग्णालयाला भेट दिली असता अपुऱ्या व्यवस्थेमुळे तेथे उपचार होणार नाहीत. तुम्ही मुंबईत जाऊन उपचार करा असं सांगण्यात आले पण त्यांच्याकडे पैश्यांची व्यवस्था नसल्यामुळे ते मुंबईत जाऊ शकत नव्हते. आज अशी परिस्थिती सर्व ग्रामीण रूग्णालयात पहावयास मिळते. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णालयाची व्यवस्था बदलावी लागणार आहे. यासाठी मी विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला या सर्व बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी भाग पाडेने असे दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
ईडी संदर्भातबोलताना ते म्हणाले की, ईडी ही स्वायत्त यंत्रणा असुन ते पुराव्याच्या आधारे चौकशीसाठी बोलवितात. कोणालाही नाहक त्रास देण्याचा त्यांचा हेतू नसतो. ईडी कोणालाही फाशी देत नाही किंवा जेल मध्ये टाकत नाही, त्यामुळे ईडीच्या चौकशीला घाबरण्याचे कारण काय? असा सवाल दरेकर यांनी केला.
काँग्रेसच्या काळातही ईडी चौकशी केली जात होती, मग आताच भाजपाचा सबंध का लावला जात आहे. काँग्रेसच्या काळातही ईडीच्या नावाने भयभीत केलं जातं होत. तेव्हा कोणी का बोलले नाही, असा सवालही दरेकर यांनी केला.
भंडारा येथील घटनेला सरकराचा नाकर्तेपणा जबाबदार विधानपरिषद -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Date:

