मुंबई। महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती अतिशय बिकट होत चालली असून कोरोनाची लाट झपाट्याने पसरत आहे. राज्यातील कोट्यवधी जनता भयभीत झाली आहे. त्यामुळे जनतेला धीर देण्यासाठी व कोरोनाची सद्यस्थिती पारपदर्शकपणे जनतसमोर मांडण्यासाठी तातडीने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी आज केली आहे. पाटील यांनी सांगितले की, राज्याची संकटकालीन वर्तमान परिस्थिती पाहता महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतिसंह कोश्यारी यांना विशेष अधिवेशनासाठी विनंती केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवून राज्यातील सर्वआमदारांसमोर राज्यातील कोरोना संसर्गाची सदयस्थिती तसेच आरोग्य व्यवस्थेचे नियोजन, आदी बाबी स्पष्ट करून सरकराने आपली भूमिका मांडली पाहिजे असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे दररोज नवीन विक्रम करत आहे. मुंबईची परिस्थिती तर अत्यंत वाईट असून राज्यात कोरोनाचे सक्रिय रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे आणि मृत्यूची संख्याही सतत वाढत आहे. जनता खूप अस्वस्थ असून राज्याची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन दोघेही सध्याचे संकट हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहेत, म्हणूनच विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून राज्याच्या स्थितीचा आढावा घेण्याची मागणी राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र हे देशातील एकमेव असे राज्य आहे जिथे कोरोनाचे आकडे स्वत:चा विक्रम मोडत आहेत. देशातमध्ये सर्वात जास्त कोरोना संसर्ग हा महाराष्ट्रात पसरत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये जेवढे एका दिवसात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत ही बाब अतिशय धोकादायक असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी निर्दशनास आणून दिले.
विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल सरकारने भूमिका मांडावी – चंद्रकांत पाटील
Date:

