रंगभूमीचा पडदा उघडताच पहिला नाट्य प्रयोग वांद्रे पश्चिम येथे रंगणार

Date:

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची संकल्पना

मुंबई, दि. 13 आक्टोबर 2021
ज्या मराठी माणसाचे आणि नाटकाचे अतूट नाते आहे त्या नाट्यरसिक आणि रंगदेवतेची राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे अनेक महिने ताटातूट झाली. आता मोठ्या संघर्षानंतर 22 ऑक्टोबरपासून रंगभूमीचा पडदा उघडणार असल्याच्या निमित्ताने वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे त्याचा आनंद साजरा करीत मराठी नाटकाचा पहिला प्रयोग समारंभपूर्वक रंगणार आहे.

अनलाँक 2 सुरू होऊन अनेक क्षेत्रांना मुभा देण्यात आली तरी नाट्यगृहाचा पडदा मात्र उघडण्यास ठाकरे सरकारने मज्जाव केला होता. त्यामुळे कलावंतावर उपासमारीची वेळ आली. त्यांनी सरकार विरोधात आंदोलन केले तीथेही सरकारने त्यांची उपेक्षाच केली. या मराठी कालावंताच्या लढ्यात सहभागी होऊन त्यांच्या संघर्षाला पाठबळ देणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी समारंभपुर्वक नाटकाला आता सुरुवात करायचे ठरवले आहे.

दि. 22 आक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे या निमित्ताने अभिनेते प्रशांत दामले यांच्या गाजलेल्या “एका लग्नाची पुढची गोष्ट” या नाटकाचा एक खास प्रयोग ठेवण्यात आला आहे. यावेळी शासनाच्या नियमितपणे 50 टक्के क्षमतेनेच विनामूल्य प्रवेश रसिकांना देण्यात येणार असून रेड कार्पेट अंथरूण व गुलाबाचे फुल देऊन नाट्य रसिकांचे स्वागत करण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी काही मराठी कलावंताना पण खास आमंत्रित करण्यात येणार आहे.

तसेच गेल्या पावणेदोन वर्षात मराठी रंगभूमीवरील पडद्यामागच्या कलावंत, तंत्रज्ञ यांची ससेहोलपट झाली. त्यांना अनेक संस्था आणि व्यक्तींनी त्यांना मदत केली. यामध्ये अभिनेते प्रशांत दामले, अशोक हांडे यांच्यासह काही सामाजिक संस्थांचा सहभाग होता. यातील काही व्यक्ती आणि संस्थांचा प्रतिनिधीक सत्कार ही यावेळी करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...