राज्यातील पहिलेच महाविद्यालय जिथे विद्यार्थ्यांना मिळणार वाहतुकीचे धडे आणि शिकाऊ परवाना

Date:

पुणे, दि. 14 – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन महाविद्यालयात परिवहन विभागातर्फे ‘रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना राज्याचे अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचा कक्ष सुरू करणारे फर्ग्युसन राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. या कक्षाच्या माध्यमातून फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुचाकी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळू शकणार आहे.

रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. संजीव भोर, डॉ. राजेंद्र शर्मा, वेस्टर्न इंडिया ऑटोमोटिव्ह असोसिएशनच्या सिमरन कौर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, ‘‘वाहन चालन परवाना मिळविणे आता सोपे झाले असले, तरी त्यासाठीची चाचणी अवघड करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने वाहन चालवण्याचा परवाना देत असताना वाहन चालकाकडून नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. भारतात लोक वाहन चालविण्याचे कौशल्य दाखवायला जातात आणि अपघात होतात. परदेशात वाहतुकीचे नियम पाळले जात असल्याने अपघातांचे प्रमाण कमी आहे. रस्ते सुरक्षा संदर्भात काम करण्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र समिती असणे आवश्यक आहे.’’

वाडकर म्हणाले, ‘‘छोट्या-छोट्या चुकांमुळे अपघात होतात. ते टाळण्यासाठी सर्वांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे.’’ प्राचार्य डॉ. परदेशी यांनी प्रास्ताविक, नेहा जाधव, शिक्षा चव्हाण यांनी सूत्रसंचालन आणि शुभांगी येवले यांनी आभार प्रदर्शन केले. स्वयंसेवक विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे प्रतिक म्हणून हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...