कॉंग्रेसचा चेहरा जनसामान्यांचा

Date:

पुणे- जनसामान्यात मिसळलेला ,जनसामान्यांचा चेहरा बनलेला कॉंग्रेस हा पक्ष आहे जो कधीही धुळीस मिळू शकत नाही , तो देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला पक्ष आहे ,लोकांना भुरळ पाडून अनेक नवनवे पक्ष वेगाने येतील आणि त्यांच्याच कृतीने तेवढ्याच वेगाने संपतील देखील पण वास्तव जाणणारा ,आणि वास्तवात जगणारा जनसामान्यांचा पक्ष अविरत पणे देशाची सेवा करत राहील हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे असे प्रतिपादन आज कॉंग्रेस भवनात अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले .

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, स्व. इंदिरा गांधी, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास श्रीमती संध्यताई सव्वालाखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.सव्वालाखे यांचा सत्कार पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आले. या  प्रसंगी  मोहन जोशी, संगीता धोंडे ( महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष ), दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, सोनाली मारणे, नगरसेविका  पूजा आनंद, सीमा सावंत, गिरिजा कुदळे उपस्थित होते.

सव्वालाखे यांच्या सूचनेनूसारआज   महिला काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक सकाळी १० वाजता काँग्रेस  भवन येथे आयोजित करण्यात आली होती . कोरोनाच्या काळात महिला काँग्रेसच्या बैठका आँनलाईन होत होत्या तसेच कोरोनाच्या काळात प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सर्व  जिल्हा शहर तालुका महिला अध्यक्षा आणि त्यांच्या सहकारी यांनी रस्त्यावर उतरून कामे केली त्याचा उल्लेख त्यांनी केला या  परीस्थितीमधील सर्व महिला  काँग्रेसचे काम,आंदोलने ,मोर्चे,, आगामी येणाऱ्या निवडणूक संबंधी तयारी नियोजन महिला काँग्रेसचे संघटन याबाबत पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हा ,शहर ,तालुका महीला अध्यक्षा आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून बैठकीत आढावा घेण्यातआला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  सूत्रसंचालन श्रीमती संगीता तिवारी यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...