Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लतादीदींच्या आठवणींनी उजळली तिन्हीसांज

Date:

पुणे : संगीतातील कुलदैवत मानल्या जाणाऱ्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांच्या सुवर्ण कालखंडाला उजाळा देत त्या मंतरलेल्या दिवसांची धुंद सैर आज पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १२ व्या ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचे उद्घाटन शिवरायांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून करण्यात आले. यावेळी भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर,प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, संगीतकार गायक डॉ. सलील कुलकर्णी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, आयडियल कॉलनी ग्राउंडचे अध्यक्ष नंदकुमार वढावकर, आदी मंचावर उपस्थित होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, “पुणेकरांना अतिशय चांगली मेजवानी देणारा हा महोत्सव आहे. संगीत माणसाला कधीही एकटे पडू देत नाही. ते शेवटपर्यंत आनंद देत राहते. त्यात लता मंगेशकर यांचा आवाज असेल, तर मग वेगळीच पर्वणी म्हणावी लागेल. त्यांचा आवाज, गाणी ही दैवी अनुभूती असते.” चित्रा वाघ म्हणाल्या, “हा महोत्सव फक्त कोथरूडचा राहिला नसून, तो आता पुण्याचा महोत्सव झाला आहे.”

लतादीदींच्या आठवणींना उजाळा देत ‘लतादीदी एक स्मरणयात्रा’ या कार्यक्रमाद्वारे सुरांजलीचा पूर्वार्ध अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. सलील कुलकर्णी यांनी लता मंगेशकर यांच्या पहिल्या गाण्यापासून ते तीन दशकांपर्यंतचा सुरेल प्रवास उलगडला. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, गायिका विभावरी आपटे-जोशी, प्राजक्ता जोशी-रानडे, शरयू दाते, गायक अनिरुध्द जोशी, प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांच्या सुरांनी हा सुवर्णकाळ उजळला.

मोगरा फुलला, चाफा बोले ना, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा, कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला, जन पळ भर म्हणतील हाय हाय, कशी जाऊ पुढे मागे, सखी ग वैरीण झाली नदी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, ये जवळी ये प्रिय सखया भगवंता… अशा एका पेक्षा एक भारावलेल्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. लतादीदींनी स्वरबध्द केलेल्या संत ज्ञानेश्वर, वसंत प्रभू, भा. रा. तांबे यांच्या अशा अद्भूत रचना यावेळी सादर झाल्या. मराठी, हिंदी गाण्यांनी वातावरण भारावले.

यावेळी दर्शना जोग, सागर साठे (की-बोर्ड), रितेश ओहोळ (गिटार), आदित्य आठल्ये (तबला), डॉ. राजेंद्र दूरकर (ढोलकी, पखवाज), अभिजित भदे (वेस्टर्न रिदम) यांनी साथसंगत केली. निलेश यादव यांनी ध्वनी संयोजन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बेळगावी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे   14 डिसेंबरला अनावरण

मुंबई- केंद्रीय दूरसंवाद तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम....

खडकवासल्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर विधानसभेत आ. तापकीरांची लक्षवेधी –

पुण्यासाठी स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर पद व समन्वय समिती स्थापनेचे...

चंद्रकांतदादा पाटील यांची वाचनप्रेमी कोथरुडकरांसाठी आनंदाची बातमी

कोथरुड मतदारसंघातील वाचकांसाठी विशेष सवलत योजना पुणे-तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

निगडी ते चाकण व्हाया वाकड मेट्रो ‘डीपीआर’ मंजुरीसाठी आ. शंकर जगताप यांच्याकडून मागणी!

चापेकरवाडा पुनर्विकास प्रकल्प; जलनिस्सारण प्रकल्प, जकात अभय योजनेबाबत मांडल्या...