शाळा उघडण्याचा निर्णय लवकरच; आरोग्यमंत्री राजेश टोपे

Date:

पुणे-राज्यातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्यासंदर्भात चार ते पाच दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली.आज शुक्रवारी राज्य कोरोना कृती दलाची मुख्यमंत्र्यांसमवेत पुन्हा बैठक आहे. या बैठकीत कृती दल काय मत व्यक्त करते त्यावर शाळा उघडण्याचा निर्णय अवलंबून राहील, असेही टोपे यांनी सांगितले.

शाळा उघडण्यासंदर्भात राज्य कृती कोरोना कृती दलाने प्रतिकूल मत व्यक्त केले होते. त्यामुळे शाळा उघडण्याबाबत निर्णय प्रलंबित ठेवला होता. डेल्टा प्लससंदर्भात राज्यात चिंतेची सध्या स्थिती नाही. त्यामुळे शाळा उघडण्याबाबत निर्णय होऊ शकतो. प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत मात्र राज्य कोणतीही घाई करणार नसून त्याबाबत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही टोपे म्हणाले.

राज्य सरकारचे कोरोनाविषयक सल्लागार सुभाष साळुंके यांनी, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटलेली आहे, तेथे शाळा उघडण्यास हरकत नाही, असे मत व्यक्त केले आहे. शालेय शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनांना १७ ऑगस्टपासून शाळा उघडण्यास संमती दिलेली होती. मात्र राज्य कोरोना कृती दलाच्या प्रतिकूल मतामुळे शाळा उघडण्याचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...