ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही आधी ही बंदी 31 डिसेंबरपर्यंत होती. त्यानंतर ती 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. आता ही बंदी 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.
31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
Date:

