हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यात सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण – राज्यपाल

Date:

पुणे, दि.१९ :-  हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार देश व विदेशात मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यासाठी  सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) हिरकमहोत्सवी वर्षांनिमित्त २१ फूट उंचीचे ‘नभ अभीप्सा’ शिल्प निरुपयोगी साहित्यांपासून साकारण्यात आले आहे. या अद्वितीय धातुकला शिल्पाचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे संचालक भुपेंद्र कँथोला, दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता राजेंद्र पाठक, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम आदी उपस्थित होते. तसेच संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी व मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे कार्यक्रमास उपस्थित होते.’नभ अभीप्सा’ धातुकला शिल्प हे जुन्या व निर्जीव साहित्यांपासून सुंदर कलाकृती उभारणी केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करत राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, दूरदर्शन व इतर माध्यमातून या सुंदर कलाकृतीचा प्रसार करा, ज्यामुळे विश्वातील लोक येथे ही कलाकृती बघण्यासाठी येतील. नवनिर्मिती क्षेत्रात रचना करणारे त्यामध्ये साहित्यिक, कवी, सिनेमा जगतातील कलावंत, चित्रकार, इत्यादींसाठी उच्च प्रेरणास्त्रोत बनले पाहिजे. छोट्या-छोट्या लोकांकडून कमी साधनांचा उपयोग करत आपल्या प्रतिभांपासून प्रेरणा देण्याचे काम करीत आहे ही चांगली बाब आहे. मनोरंजनासोबतच ज्ञानप्रसाराचे काम होत असल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. या संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करताना देशभरासह विश्वातील अनेक मान्यवर आले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपाल श्री कोश्यारी यांनी व्यक्त केली.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचा इतिहास सांगत संस्थेचे संचालक कँथोला म्हणाले, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. चित्रपट शिक्षणाची पुणे ही काशी आहे. सिनेमा क्षेत्र हे कला व विज्ञान यांचा अद्भभुत संगम आहे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी ऐतिहासिक प्रभात स्टुडिओमधील जुने व नवीन प्रकारच्या कॅमेरे, लाईट्स तसेच चित्रपट निर्मिती विषयक दुर्मिळ साहित्यांची पाहणी केली.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते कला दिग्दर्शन विभागप्रमुख प्रसन्न जैन आणि कला निर्मिती विभागप्रमुख विक्रम वर्मा यांच्या संकल्पनेतून ‘नभ अभीप्सा’ हे शिल्प साकारल्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करुन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ शास्ता व रुचिरा कदम यांनी केले तसेच प्रास्ताविक कुलसचिव सैय्यद रबीरश्मी आणि उपस्थितांचे आभार दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता पाठक यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...