पुणे- काँग्रेस पक्षाच्या १३५ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने
काल काँग्रेस भवन येथे छायाचित्र प्रदर्शन व ध्वनीचित्रफित मार्फत काँग्रेस पक्षाच्या १३५ वर्षांच्या
प्रवासाचे प्रक्षेपन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष
लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाचा मोठा
इतिहास आहे. लॉर्ड ए. ओ. ह्युम यांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. काँग्रेस पक्षाचे पहिले
अधिवेशन पुण्यात होणार होते परंतु प्लेगच्या साथीमुळे हे अधिवेशन मुंबईमध्ये घेण्यात आले. गोपाळ
कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू,
वल्लभभाई पटेल, पं. नेहरू सारखे थोर नेते आणि क्रांतीकारांमुळे देशाला स्वातंत्र मिळाले. अनेक
स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रहामुळे
ब्रिटीशांना नाईलाजाने भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले. गेल्या १३५ वर्षात काँग्रेसने देशासाठी अनेक
प्रगतीची पाऊले उचलून देशाचा विकास केला.’
माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाने मानवता, समता व आध्यात्मिक
विचाराने देशाचा विकास केला. काँग्रेस पक्षाच्या देह धोरणांमध्ये धर्मनिरपेक्ष असल्यामुळे समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन काम काँग्रेस पक्षाने १३५ वर्षे केले आहे. महात्मा गांधींनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात अनेक आंदोलने करून स्वातंत्र्य मिळवून दिले.’’
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले की, ‘‘१०० वर्षांपूर्वी २६ डिसेंबर १९२०
च्या नागपूर अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाने ब्रिटीश सरकार विरोधात असहकार चळवळ करण्याचा
निर्णय घेतला. आज पुणे शहर काँग्रेसने १३५ वर्षांचा काँग्रेसच्या प्रवासाचा छायाचित्र प्रदर्शन व
ध्वनीचित्रफिती मार्फत प्रक्षेपन करून लोकांमध्ये काँग्रेस पक्षाने देशासाठी केलेल्या योगदानाचे प्रबोधन केले आहे. काँग्रेस पक्षाने आधुनिक विचार करून देशावर राज्य केले. महात्मा गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीचे अध्यक्ष केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेमुळे आज जनतेला लोकशाहीचा अधिकार मिळाला आहे. पं. जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दून शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव व डॉ. मनमोहन सिंग यांनी भारत देशाला सुजलाम सुफलाम केले आहे.
१३५ वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेसने प्रत्येक गाव व खेड्यात जावून जनतेशी नाळ जोडून
पक्ष बळकट करून देशात पुन्हा सत्तेत यायचा निर्धार करावा. आज देशामध्ये जातीय धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे. काँग्रेस पक्षाला संविधानाचे रक्षण करण्याची अत्यंत गरज आहे. काँग्रेसच्या थोर नेत्यांचे स्मरण करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारत देशाला एक धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत.’’
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, बाळासाहेब दाभेकर, अविनाश बागवे, लता राजगुरू, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, रजनी त्रिभुवन, सुनिल मलके, ब्लॉक अध्यक्ष प्रविण करपे, सचिन आडेकर, सतिश पवार,विजय खळदकर, सुनिल घाडगे, भुजंग लव्हे, सादिक शेख, ऋषिकेश बालगुडे, मीरा शिंदे, प्रकाश पवार, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, विनय ढेरे, आयुब पठाण, सुरेश कांबळे, सुनिल दैठणकर, बाळासाहेब मारणे, शिलार रतनगिरी, विठ्ठल गायकवाड, प्रशांत वेलणकर, राजू गायकवाड, देवीदास मगर, अविनाश अडसूळ आदींसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव बोराडे यांनी केले तर आभार युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल मलके यांनी मानले.

